शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

एमएचसीईटी परीक्षा ५ मे रोजीच होणार - विनोद तावडे

By admin | Updated: April 29, 2016 19:12 IST

सर्वोच्च न्यायालयाने मेडिकल प्रवेश परिक्षेसाठी ‘नीट’ परीक्षा घेण्यास सांगितले आहे.मात्र राज्‍यात येत्‍या ५ मे रोजी एमएचसीईटी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार असून महाराष्‍ट्रातील

मुंबई,दि.२९ -  सर्वोच्च न्यायालयाने मेडिकल प्रवेश परिक्षेसाठी ‘नीट’ परीक्षा घेण्यास सांगितले आहे.मात्र राज्‍यात येत्‍या ५ मे रोजी एमएचसीईटी परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच घेण्यात येणार असून महाराष्‍ट्रातील विद्यार्‍थ्‍यांनी ही परीक्षा दयावी असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात राज्‍य सरकार फेरविचार याचिका दाखल करणार असल्‍याचेही ते म्‍हणाले.
महाराष्‍ट्रात एसएससी,सीबीएसई,आयसीएसई असे विविध अभ्‍यासक्रम आहेत.ग्रामीण महाराष्‍ट्रातील तसेच गरिब घरातील विदयार्थी एसएससी बोर्डाचेच शिक्षण घेतात.अशा विद्यार्‍थ्‍यांना तयारीला वेळ मिळणार नाही.सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण ज्‍या संस्‍थांनी नेले त्‍यांचा प्रमुख आक्षेप हा सरकारी व खासगी कॉलेजांत होणा-या वेगवेगळया प्रवेश परिक्षांना होता.महाराष्‍ट्रात मात्र याआधीपासूनच सरकारी व खासगी वैद्यकिय महाविद्यालयांतील प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्यात येते.हे मुददे फेरविचार याचिकेत मांडण्यात येणार आहेत.राज्‍य सरकारचे दोन अधिकारी दिल्‍लीत पोहोचले असून राज्‍याचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिनिधितव करणारे वकिल यांच्याशी ते चर्चा करणार आहेत.तसेच फेरविचार याचिकेसाठी विशेष वकिल देखील नेमण्यात येणार असल्‍याचेही विनोद तावडे यांनी सांगितले.
यामुळे ५ मे रोजी मेडिकल प्रवेशासाठी होणारी एमएचसीईटी परीक्षा विद्यार्‍थ्‍यांनी द्यावी असे आवाहनही विनोद तावडे यांनी केले आहे.