शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वागळेत म्हाडा उभारणार एक हजार बेडचे रुग्णालय, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 17:41 IST

ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आता वागळे इस्टेट भागात १ हजार बेडचे, मुंब्य्रात ५०० बेडचे रुग्णालय उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर कळव्यात ५०० बेडसाठी जागेचा शोध सुरु असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

ठाणे : ठाणे शहरात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने हॉस्पीटलमधील बेडची संख्या आता अपुरी पडू लागली आहे. ग्लोब्लह इम्पॅक्ट हब येथे १ हजार बेडच्या रुग्णालयाचे काम सुरु असतांना आता वागळे इस्टेट भागात एका खाजगी कंपनीच्या गोडावूनच्या ठिकाणी म्हाडाच्या वतीने १ हजार बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तर मुंब्य्रात ५०० बेडचे आणि कळव्यात ५०० बेडसाठी जागेचा शोध सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.               ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. रोज नवीन १०० हून अधिक रुग्ण कोरोनाचे शहरात आढळत आहेत. त्यामुळे आतापर्यंत ही संख्या १८०० च्या घरात गेली आहे. शहरातील पाच खाजगी रुग्णालयातील बेड यासाठी आरक्षित ठेवण्यात आले आहेत. तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयातील देखील कोरोना बाधीत रुग्णांना उपचार सुरु आहेत. परंतु कोरोनाचा प्रार्दुभाव आता झोपडपटटी भागात अधिक होऊ लागला आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या ही दिवसागणिक वाढत आहे. यावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका स्तरावर विविध उपाय योजना केल्या जात आहेत. परंतु तरीही रुग्णांची संख्या कमी होतांना दिसत नाही. त्यात आता येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होईल अशा काळात रुग्णांचे अधिक हाल होण्याची शक्यता नाकारात येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नवीन तात्पुरत्या स्वरुपातील रुग्णालये सुरु करण्यासाठी शनिवारी गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या निवास्थानी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांच्या उपस्थितीत या संदर्भात महत्वाची बैठक पार पडली. यावेळी म्हाडाच्या वतीने वागळे इस्टेट भागात एका खाजगी कंपनीच्या गोडावूनच्या ठिकाणी तब्बल १ हजार बेडचे रुग्णालय उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. त्याचे नियोजन आता युध्द पातळीवर सुरु झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लवकरात लवकर हे रुग्णालय सुरु होईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.दुसरीकडे कळवा, मुंब्रा भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. परंतु मुंब्य्रात एकच रुग्णालय असल्याने उर्वरीत रुग्णांना ठाण्याच्या दिशेने धाव घ्यावी लागत आहेत. त्यामुळे रुग्णांना त्यांच्याच भागात उपचार मिळाल्यास ते सोईचे ठरणार आहे. त्या अनुषंगाने आता मुंब्य्रात एका शाळेत ५०० बेडचे रुग्णालय उभारण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे मुंब्य्रातील रुग्णांना आता जवळच उपचार घेणे शक्य होणार आहे. तिकडे कळव्यातही ५०० बेडचे रुग्णालय सुरु करण्याचा विचार सुरु आहे. पंरतु या ठिकाणी जागेचा अभाव आहे, मैदानाचा विचार सुरु होता, परंतु पावसाळ्यात रुग्णांचे तेथे हाल होऊ शकतात. त्यामुळे कळव्यात इतर कुठे जागा मिळते का? याचा शोध सुरु असल्याचेही माहिती आव्हाड यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाhospitalहॉस्पिटल