शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जमीन नसताना म्हाडाचे कागदी इमले!

By admin | Updated: November 8, 2016 05:23 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवडणाऱ्या घरांची महत्वाकांक्षी योजना म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी फक्त कागदी घरे बांधूनच पूर्ण करण्याचा चंग बांधल्याचे समोर आले आहे

अतुल कुलकर्णी, मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परवडणाऱ्या घरांची महत्वाकांक्षी योजना म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी फक्त कागदी घरे बांधूनच पूर्ण करण्याचा चंग बांधल्याचे समोर आले आहे. इंचभर जागा ताब्यात नसतानाही ९ठिकाणी घरांचे इमले बांधण्याची जाहिरात म्हाडाने दिली आहे.म्हाडाच्या या ‘स्वप्ननगरी’वर गृहनिर्माण विभागाच्या सचिवांनी गंभीर आक्षेप घेतले असून गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी पुढील कारवाईला स्थगिती देऊन टाकली आहे. विशेष म्हणजे, जेवढी घरे बांधायची आहेत तेवढ्या घरांसाठी केंद्र शासनाने स्वत:चा हिस्सा म्हणून तब्बल ३८० कोटी रुपये राज्याला देऊ केले आहेत. पण पैसे मिळूनही जागाच नसल्याने सध्या तरी ही घरे कागदावरच आहेत.केंद्र शासनाने परवडणारी घरे या योजनेअंतर्गत राज्यात गोरगरिबांसाठी ११ लाख घरे बांधण्याची घोषणा युती सरकारने केली होती. मात्र या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली तरी एकही घर बांधले गेले नाही. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दुवा म्हणून प्रस्ताव तयार करण्याची, राज्याची बाजू मांडण्याची जबाबदारी म्हाडावर देण्यात आली. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक ‘स्टेट लेव्हल मॉनिटरिंग कमिटी’ही स्थापन करण्यात आली. या समितीकडे म्हाडाने प्रस्ताव सादर करायचे, समितीने त्या प्रस्तावांची छाननी करायची आणि त्यानंतर ते प्रस्ताव केंद्राकडे पाठवायचे अशी कार्यपध्दती निश्चित करण्यात आली. त्यानुसार म्हाडाने एकूण १,०७,८७४ घरांचे प्रस्ताव सादर केले. त्यातील ६३,२८२ घरांचे प्रस्ताव मुख्य सचिवांच्या समितीने मान्य केले. ३७,१७७ घरांचे प्रस्ताव काही पुढे ढकलले गेले आणि राज्य समितीच्या आक्षेपानंतर ७४१५ घरांचे प्रस्ताव म्हाडाने मागे घेतले.मात्र म्हाडाने बारवे गाव-कल्याण, भंडारली-कल्याण, गोठेघर-ठाणे, बोळींज वसई, खोनी-कल्याण, निरजेपाडा-कल्याण, शिरढोण-कल्याण, वाव्हे-कर्जत, केळावली-खालापूर या नऊ ठिकाणच्या ११ जागांवर घरे बांधण्याची जाहिरात देऊन टाकली. मात्र, यातील एकही जागा म्हाडाच्या ताब्यात नाही. शिवाय वाव्हे, केळावली, बोळींज आणि खोनी या चार जागांचे प्रस्ताव राज्य समितीने मंजूर केलेले नसतानाही त्यांचा समावेश जाहिरातीत कसा? याचीही चौकशी होण्याची गरज आहे, असे मंत्रालयातील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांच्याशी वारंवार संपर्क साधला; पण त्यांनी दूरध्वनी घेतला नाही वा संदेशाला उत्तरही दिले नाही.