शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाचे सदनिका हस्तांतरण सुलभ

By admin | Updated: July 14, 2015 01:24 IST

नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम व समयोजित लोकसेवा देण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हमी कायद्याची महाराष्ट्र

मुंबई : नागरिकांना पारदर्शक, कार्यक्षम व समयोजित लोकसेवा देण्यासाठी राज्यात लागू करण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हमी कायद्याची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) बुधवार, १५ जुलैपासून अंमलबजावणी करणार आहे. यानुसार विविध विभागीय मंडळांमधील ‘मित्र’ या एक खिडकी योजनेंतर्गत नागरिकांना सदनिका हस्तांतरणापासून भूखंड विक्रीस परवानगी मिळविण्यापर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा २८ एप्रिलपासून राज्यात लागू झाला. या कायद्यांतर्गत प्रशासकीय कामाबाबत नागरिकांना हमी देण्यात आली आहे. १६0 सेवांचा या कायद्यात समावेश आहे. या कायद्यांतर्गत म्हाडाच्या मुंबई येथील मुख्यालयासह नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागीय मंडळांमधील ‘मित्र’ या एक खिडकी योजनेंतर्गत नागरिकांना १० सुविधा आॅनलाइन उपलब्ध केल्या जातील.यासंदर्भात म्हाडातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे; तसेच याची योग्य अंमलबजावणी करण्याचे बंधन प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राहील. विहित कालावधीत सेवा न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)‘मित्र’मधील सुविधानिवासी सदनिका / भूखंड भोगवटाबदल (हस्तांतरण), अनिवासी सदनिका / भूखंड भोगवटाबद्दल, निवासी सदनिका / भूखंड नियमितीकरण, अनिवासी सदनिका, थकबाकीबाबतचे ना देय प्रमाणपत्र, सदनिका वित्तीय संस्थेकडे तारण ठेवण्यास ना हरकत प्रमाणपत्र, सदनिका विक्री परवानगी, कर्जाची थकबाकी भरणा पत्र, निवासी सदनिका भाडेतत्त्वावर देण्यास ना हरकत प्रमाणपत्र देणे आदी सुविधा ‘मित्र’मधून आॅनलाइन दिल्या जातील.