शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा लाचखोर पाटीलची कारकीर्द काळवंडलेली

By admin | Updated: April 21, 2017 03:29 IST

म्हाडाच्या सदनिकेसाठी पात्र ठरविण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कोकण विभागातील उपमुख्याधिकारी संजय काशीनाथ पाटील

जमीर काझी,  मुंबईम्हाडाच्या सदनिकेसाठी पात्र ठरविण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कोकण विभागातील उपमुख्याधिकारी संजय काशीनाथ पाटील (वय ५४) याची कारकीर्द वादग्रस्त व काळवंडलेली आहे. ज्या विभागात तो नियुक्तीला आहे, तेथे हात ‘ओला’ केल्याशिवाय फाइल पुढे सरकत नाही, अशी त्याची ख्याती आहे. सात वर्षांपूर्वी त्याला एसीबीकडून अटक झाली होती. मात्र सर्व ‘मॅनेज’ करत पुन्हा हजर होत बढतीही घेतल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.पाटीलच्या भ्रष्टाचाराच्या रॅकेटमध्ये आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या बड्या ‘माशां’वर कधी कारवाई होणार, अशी चर्चा सध्या म्हाडाच्या वर्तुळात रंगली आहे. कोकण विभागाच्या विरार-बोळिंज येथील घरांच्या सोडतीत विजेती ठरलेली एक तरुणी कागदपत्राच्या छाननीमध्ये अपात्र ठरली. मात्र पाटीलने त्याबाबत पुन्हा प्राधिकरणाकडे प्रतिज्ञापत्र सादर करून तिला पात्र करतो, असे सांगून तिच्या पित्याकडे ५० हजारांची मागणी केली. त्याबाबत एसीबीकडे त्यांनी तक्रार दिली. विभागाने सापळा रचून त्याला रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेण्यात आली. त्याचे कार्यालय व घराची झडती घेण्यात येत आहे. म्हाडाच्या वर्तुळात दिवसभर त्याच्या ‘कार्यपद्धती’ची चर्चा रंगली होती. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक गरजू नागरिकाला हेरायचे, कामाच्या स्वरूपाप्रमाणे त्याच्याकडे थेट पैशांची मागणी करायची, त्यासाठी तो वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे घेऊन त्यांनाही पैसे द्यावे लागतात, असे सांगत रकमेचा आकडा वाढवत असे. रकमेची पूर्तता न केल्यास कोणत्याही परिस्थितीत फाइल पुढे सरकणार नाही, असे तो धमकावत असे. त्यामुळे गरजू नागरिक भीतीपोटी त्याच्या मागणीप्रमाणे पूर्तता करीत असत.संजय पाटील हा २०१०मध्ये मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळात (आरआर बोर्ड) मिळकत व्यस्थापक म्हणून कार्यरत होता. त्या वेळी एका रॅकेटमध्ये त्याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली होती. एसीबीच्या पथकाने मध्यरात्री पाटील याच्या घरून त्याला अटक केली. मात्र तपासातून निर्दोष ठरत तो पुन्हा सेवेत रुजू झाला. पदोन्नतीही घेतली होती. आता अटक झाल्याने पुन्हा त्याच्या ‘कार्यपद्धती’ची चर्चा सुरू झाली आहे.