शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो ऑन ट्रॅक आजपासून मुंबईकरांच्या सेवेत

By admin | Updated: June 8, 2014 02:09 IST

उद्यापासून अवघ्या २१ मिनिटांत एसीची हवा खात खात मुंबईतला चाकरमानी घाटकोपरहून अंधेरीला पोहोचणार आहे.

मेट्रो ऑन ट्रॅक आजपासून मुंबईकरांच्या सेवेतमुंबई : घाटकोपरहून साकिनाका, चकला, मरोळ, अंधेरी किंवा एअरपोर्ट हा पोटात गोळा आणणारा, वाहतुक कोंडीत थकवणारा प्रवास चुटकीसरशी, अत्यंत आरामात पूर्ण करून देणारी मेट्रो उद्यापासून लाखो चाकरमान्यांच्या सेवेत रूजू होणार आहे. उद्यापासून अवघ्या २१ मिनिटांत एसीची हवा खात खात मुंबईतला चाकरमानी घाटकोपरहून अंधेरीला पोहोचणार आहे. असल्फा, चकाला, साकिनाका, एअरपोर्ट मार्ग, मरोह येथील वाहतूककोंडी भेदण्यात मुंबईकरांचे रोजचे तीन तास फुकट जात होते. त्यामुळेच मेट्रो सुरू होत असल्याने या मार्गावरून प्रवास करणारे लाखो चाकरमानी सुखावले आहेत. या प्रत्येकाला मेट्रो प्रवासाची उत्सुकता आहे. इतकी की इतकी की हा महत्वाकांक्षी प्रकल्प तब्बल चार वर्षांच्या विलंबाने प्रत्यक्षात उतरला ही बाब त्यांच्या विस्मृतीत शिल्लक नाही.मेट्रो हा शहरातील प्रवासासाठीचा सहावा सार्वजनिक पर्याय आहे. लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी आणि मोनो यानंतर आता मेट्रोही मुंबईतल्या सार्वजनिक प्रवासासाठीचा उत्तम पर्याय ठरू शकेल. उद्या(८ जून) सकाळी साडेदहा वाजता उद्घाटनानंतर दुपारी एक वाजल्यापासून मेट्रो अधिकृतरित्या मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. विशेष बाब म्हणजे सुरूवातीचा एक महिना फक्त दहा रूपयांमध्ये मेट्रोतून प्रवास करता येईल. केंद्रीय रेल्वे बोर्डाने हिरवा कंदिल दिल्यानंतर प्रत्यक्षात मेट्रो कधी धावणार? याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले होते. शिवाय मेट्रो सुरु करण्यासह मेट्रोच्या तिकिट दराहून राजकीय पक्षांमध्ये खडाजंगी सुरु झाली होती. मात्र शनिवारी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने या वादावर पडदा टाकत उद्यापासून हा प्रकल्प सुरू करणार अशी घोषणा केली आणि ती वार्‍यासारखी शहरात पसरली. या घोषणेमुळे घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मार्गावरून प्रवास करणार्‍या लाखो प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. आणि याआधीचा प्रवास किती कंटाळवाणा होता, किती वेळ लागायचा, रिक्षा-टॅक्सीसाठी किती पैसा ओतावा लागत होता या चर्चांना उत आला.इन्फोबॉक्स, पॉईंटर्सपहाटे ५.३० ते रात्री १२ या वेळेत मेट्रो सेवा सुरू राहिल. दररोज १६ मेट्रो ट्रेन घाटकोपर ते वर्सोवा मार्गावर धावतील. प्रत्येक मेट्रोला वातानुकुलित चार कोच असतील. एकूण १५०० प्रवासी वाहून नेऊ शकेल. विशेष म्हणजे पहिले ३० दिवस मुंबईकरांना मेट्रोतून अवघ्या दहा रुपयांत प्रवास करता येणार आहे.