शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

मेट्रो-३ ने गाठता येणार एसटी स्थानक

By admin | Updated: January 20, 2017 05:06 IST

मुंबईत होणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाची जोडणी रेल्वेबरोबरच एसटीलाही देण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईत होणाऱ्या कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पाची जोडणी रेल्वेबरोबरच एसटीलाही देण्यात येणार आहे. मेट्रो-३ च्या भुयारी मार्गासाठी लागणारी मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयाची जागा उपलब्ध करण्यात आली आहे. मेट्रोच्या प्रस्तावानुसार मुंबई सेंट्रल येथील एसटी मुख्यालयाच्या जागेतून भुयारी मार्गाद्वारे एसटी प्रवाशांना मेट्रो स्थानक गाठता येईल. त्यामुळे एसटीतून मुंबई सेंट्रल येथे येताच प्रवाशांना त्वरित मेट्रो-३ ची सेवा उपलब्ध होईल. एसटीचे मुंबई सेंट्रल आगार व स्थानक हे महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकातून दिवसाला ६२६ बस फेऱ्या सुटतात आणि दररोज दहा हजार प्रवासी या स्थानकातून ये-जा करतात. बाहेरगावाहून एसटीने मुंबई सेंट्रल स्थानकात येताच मुंबईत विविध ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी रेल्वे स्थानक, बस, टॅक्सीचा आधार घेतात. हीच स्थिती मुंबईच्या विविध भागांतून एसटी पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांबाबतही होते. त्यातच मुंबईतील प्रचंड वाहतूककोंडीमुळे एसटीच्या मुंबई सेंट्रल स्थानकात वेळेत पोहोचू की नाही, असा प्रश्न पडतो. यातून एसटी प्रवाशांची मेट्रो-३ मुळे सुटका होणार आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा मेट्रो-३ प्रकल्प होत असून मुंबई सेंट्रल येथेही त्याचे स्थानक असेल. मुंबई सेंट्रल येथे होणारे स्थानक हे भूमिगत होईल. हे स्थानक बनवतानाच त्याची जोडणी पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकाला देतानाच एसटीच्या स्थानकालाही जोडणी देण्यात येणार आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांना मोठा फायदा होईल. एसटीच्या मुख्यालयातील आवारातच भुयारी मार्ग बनवला जाणार असून त्यातून मेट्रो स्थानक गाठता येईल. या भुयारी मार्गासाठी लागणाऱ्या जागेची पूर्तता करण्यात आली असून एसटीकडून २४६ चौरस मीटर जागा उपलब्ध करण्यात येईल. ही जागा उपलब्ध करण्यासाठी शासनाकडूनच आदेश देण्यात आले आहेत. हा भुयारी मार्ग एसटी प्रवाशांना उपलब्ध होतानाच त्यातून मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक, मराठा मंदिर, लॅमिंग्टन रोडच्या दिशेनेही जाता येईल. एसटीच्या हद्दीत प्रकल्प बनताच मुंबई सेंट्रल आगाराला वेगळे महत्त्व प्राप्त होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात प्रवेश करताच उजव्या बाजूला असणाऱ्या वाहन पार्किंग परिसरातून भुयारी मार्ग बनेल. त्यामुळे एसटी आगार व स्थानकात उतरताच प्रवाशांना मेट्रोने मुंबईतील अन्य ठिकाणी जाता येईल. ।मेट्रो-३ साठी एसटीच्या मुंबई सेंट्रल मुख्यालयातील काही जागा उपलब्ध झालेली आहे. तेथे भुयारी मार्ग बनेल आणि येथून एसटी प्रवाशांसाठी एन्ट्री-एक्झिट ठेवली जाईल. - अश्विनी भिडे, व्यवस्थापकीय संचालक, मुंबई मेट्रो