शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोची ‘स्मार्ट’ भरारी

By admin | Updated: July 14, 2014 03:17 IST

मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत येताच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या मेट्रोची नवीन भाडेवाढ जुलै महिन्यात लागू

मुंबई : मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत येताच त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या मेट्रोची नवीन भाडेवाढ जुलै महिन्यात लागू झाल्यानंतर आणि यामध्येही स्मार्ट कार्डद्वारे प्रवास स्वस्त केल्याने मेट्रो प्रवाशांनी स्मार्ट कार्डलाच अधिक पसंती दिल्याचे दिसून आले आहे. नवीन भाडेवाढ लागू होताच पाच दिवसांत तब्बल ३0 हजार स्मार्ट कार्डची विक्री झाली आहे. मुंबईकरांच्या पसंतीस मेट्रो उतरावी यासाठी एक महिना त्याचे भाडे १0 रुपये ठेवले. मात्र मेट्रो सुरू होण्यापूर्वीच भाडे ठरवण्यावरून राज्य सरकार आणि मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये वाद रंगला. भाडेदराचा वाद न्यायालयात असल्याने मेट्रोचे नवीन पण अल्प भाडे ८ जुलैपासून लागू केले. वर्सोवा ते घाटकोपर कमीतकमी भाडे १0 रुपये आणि जास्तीतजास्त भाडे २0 रुपये आकारणी करण्याचा निर्णय झाला. टोकन काढून प्रवास केल्यास वर्सोवा ते घाटकोपर प्रवासासाठी २0 रुपये मोजावे लागत आहेत. तर स्मार्ट कार्ड काढून प्रवास केल्यास १५ रुपये भाडे आकारणी होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी स्मार्ट कार्डलाच जास्त पसंती दिली आहे. ८ जुलैपासून भाडे लागू होताच आतापर्यंत ३0 हजार स्मार्ट कार्डची विक्री झाली आहे. मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून मेट्रोच्या पहिल्या वर्षात स्मार्ट कार्डची ७0 टक्के विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र आतापर्यंत ५0 टक्के विक्री झाल्याचे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रवक्ताने सांगितले. मेट्रो सुरू होताच पहिल्या महिन्यापासून प्रत्येक दिवशी सरासरी ४ हजार स्मार्ट कार्डची विक्री होत आहे. आतापर्यंत २ लाख २५ हजार स्मार्ट कार्डची विक्री झाली आहे. (प्रतिनिधी)