शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

मेट्रो धावणार सुसाट

By admin | Updated: October 7, 2015 05:35 IST

मुंबई मेट्रो मार्ग २मधील दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील दहिसर(पूर्व)-डी.एन. नगर यासह मुंबई मेट्रो मार्ग-७मधील अंधेरी (पूर्व)-दहिसर (पूर्व)

मुंबई : मुंबई मेट्रो मार्ग २मधील दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द या मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील दहिसर(पूर्व)-डी.एन. नगर यासह मुंबई मेट्रो मार्ग-७मधील अंधेरी (पूर्व)-दहिसर (पूर्व) या उन्नत मेट्रो मार्ग प्रकल्पाच्या कामाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यासाठी १२ हजार ६१८ कोटींची तरतूद असेल. दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील दहिसर (पूर्व) ते डी.एन. नगर या १८.६० किलोमीटर मार्गाच्या उभारणीस मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी ६ हजार ४१० कोटी रुपये खर्च येणार आहे. राज्य शासनातर्फे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे १ हजार ८९२ कोटी, राज्य शासनाकडून कर्जापोटी ७५७ कोटी, केंद्र शासनाकडून कर्जापोटी २९२.५० कोटी, या प्रकल्पास नाममात्र दराने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाचे साहाय्य म्हणून ६६५ कोटी तसेच एमएमआरडीएकडून कर्जस्वरूपात २ हजार ८०३ कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. या मार्गावर १७ स्थानके असतील.६ हजार २०८ कोटींचा खर्चमुंबई मेट्रो मार्ग-७मधील अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या १६.५ किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या उभारणीसही हिरवा कंदील दाखविण्यात आला. हा मार्ग पूर्णत: उन्नत स्वरूपातील असून, त्यासाठी सुमारे ६ हजार २०८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हे भांडवल उभे करण्यासाठी राज्य शासनातर्फेमुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे २ हजार ३२० कोटी, राज्य शासनाचे कर्जापोटी ७३३.५० कोटी, केंद्र शासनाचे कर्जापोटी ३०२.५० कोटी, प्रकल्पास नाममात्र दराने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाचे साहाय्य म्हणून ६०६ कोटी तसेच एमएमआरडीएकडून कर्जस्वरूपात २ हजार २४६ कोटी रुपये उभारण्यात येणार आहेत. या दोन्ही प्रकल्पांतील मार्गांवर पहिल्या ३ किमीसाठी १० रुपये, त्यानंतरच्या ३ ते १२ किमी या टप्प्यासाठी २० रुपये तर १२ किमी अंतराच्या पुढील टप्प्यासाठी ३० रुपये भाडे असेल.मुंबईच्या परिवहन सेवेसाठी आवश्यक असणारे हे प्रकल्प ‘निकडीचा सार्वजनिक प्रकल्प’ आणि ‘महत्त्वपूर्ण नागरी परिवहन प्रकल्प’ म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या प्रकल्पांसाठी लागणारा प्रशासकीय आणि व्यवस्थापकीय खर्च २ टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पांसाठी महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळाकडून ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन शिफारस करणार आहे. एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण असेल.या प्रकल्पाकरिता विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेऊन त्याचे व्याज आणि परतफेडीची जबाबदारी एमएमआरडीवर सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पांकरिता आवश्यक असणारी जमीन एमएमआरडीएला नाममात्र भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ंपंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजनया दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ आॅक्टोबरला होणार आहे.