शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो मार्ग अनिश्चित; बीआरटी असुरक्षित

By admin | Updated: May 17, 2016 01:25 IST

मेट्रोला केंद्राची मंजुरी मिळत नाही, त्यामुळे तिचा मार्ग निश्चित करता येत नाही.

पुणे : मेट्रोला केंद्राची मंजुरी मिळत नाही, त्यामुळे तिचा मार्ग निश्चित करता येत नाही. नगर रस्ता बीआरटी मार्ग त्यामुळेच असुरक्षित झाला आहे, अशी टीका करीत महापौर प्रशांत जगताप यांनी बीआरटी मार्गावरील समस्यांची जबाबदारी थेट केंद्र व राज्य सरकारवर ढकलली. भाजपा सरकार बहुतेक महापालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मेट्रोची घोषणा करेल, असे राजकीय टोलाही त्यांनी या वेळी भाजपला लगावला.पीएमपीएमएल संचालकांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देताना नगर रस्ता बीआरटी मार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातांबाबत विचारले असता महापौर जगताप यांनी त्याचा ठपका थेट केंद्र सरकारवरच ठेवला. ते म्हणाले, ‘‘हा मार्ग सुरू करण्याची घाई केली जाते, या टीकेत तथ्य नाही. या रस्त्यावरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी मार्ग सुरू करणे आवश्यकच होते. तसा तो सुरू करण्यात आला. अपघात टाळण्याची शिकस्त सुरू आहे. त्यासाठी सध्या तरी वॉर्डन वाढवणे, सिग्नल्सची संख्या वाढवणे, बीआरटी मार्गावर इतर वाहनांना येऊ न देणे हे उपाय केले जात आहेत. मात्र, सब-वेची संख्या वाढवायला हवी, पादचाऱ्यांसाठी काही ठिकाणी क्रॉसिंग करणे गरजेचे आहे. या गोष्टी मेट्रोचा मार्ग निश्चित होत नाही तोपर्यंत करता येणे शक्य नाही व केंद्र सरकार राजकीय हेतू मनात ठेवून निर्णय द्यायला तयार नाही.’’ (प्रतिनिधी)।सर्व वाहनांवर लवकरच जीपीएस यंत्रणापीएमपीच्या सर्व वाहनांना यापुढे जीपीएस यंत्रणा बसवण्यात येणार आहे, असे महापौरांनी सांगितले. त्यामुळे वाहनांना उशीर का झाला, कोणते वाहन नादुरूस्त झाले, त्यातील प्रवाशांसाठी त्वरित दुसरे वाहन उपलब्ध करून देता येणे शक्य होणार आहे. यासाठीचा नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे काम सुरू आहे. येत्या २५ जूनपर्यंत ही यंत्रणा सुरू होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला. मोबॅलिटी कार्ड सुविधाही सुरू करण्यात येईल. हे कार्ड स्वॅप केले की तिकीट निघेल, अशी स्वॅप यंत्र वाहनांमध्ये, प्रमुख बसथांब्यांवर बसवण्यात येतील. मोबाईल चार्ज करतो त्याप्रमाणे हे कार्ड रिचार्ज करता येईल, तसेच ते मॉल व अन्य ठिकाणाच्या खरेदीसाठीही वापरता येईल, अशी माहिती महापौरांनी दिली. किती वाहने भाडेतत्त्वावर घ्यायची, किती विकत घ्यायची, याबाबतचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अहवाल मिळाला आहे. पुणे आयुक्तांचा अहवालही लवकरच मिळेल, त्यानंतर याबाबत निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.