शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची मेट्रो पळेना

By admin | Updated: June 7, 2017 01:20 IST

खासगी जागाच नव्हे तर शासकीय जागा देण्यासही आस्थापनांनी विरोध केल्याने पुण्याच्या मेट्रोला अडथळे आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : खासगी जागाच नव्हे तर शासकीय जागा देण्यासही आस्थापनांनी विरोध केल्याने पुण्याच्या मेट्रोला अडथळे आले आहेत. मेट्रोबाबत नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी जनता दरबार घेतले जात आहेत. परंतु, शासकीय कार्यालयाचे ऐकण्यास नागरिक तयार नसल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी कर्मचाऱ्यांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत आंदोलनाची तयारी करत असल्याचेही समजते. यामुळे पुणे मेट्रोला अडथळ्यांचा प्रवास करावा लागणार आहे. मेट्रोच्या मार्गाची आखणी करताना मोठ्या प्रमाणावर शासकीय जागा मिळणार असल्याने भूसंपादनाचा प्रश्न येणार नाही, असे पुणे मेट्रो कॉर्पोरेशनकडून सांगण्यात येत होते. मात्र, या जागांवरील आस्थापनांना विश्वासात घेतले गेले नाही. सर्वांत मोठा विरोध कृषी महाविद्यालयाकडून होत आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गासाठी कृषी महाविद्यालयाच्या सुमारे ३० एकर जागेवर मेट्रो प्रकल्पाचा डेपो उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. परंतु ही जागा संपादीत केल्यास कृषी शिक्षणाच्या मॉडेलचा धोका निर्माण होऊ शकतो. केंद्र शासनाच्या नियमानुसार कृषी महाविद्यालयासाठी १२० हेक्टर जमीन आवश्यक असते. सध्या महाविद्यालयाकडे केवळ ९० हेक्टर जमीन शिल्लक राहिली आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत कृषी महाविद्यालयाची जागा संपादीत करण्यात येऊ नये, अशी मागणी कृषी महाविद्यालयाच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी केली आहे. याशिवाय हाफकिन इन्स्टिट्यूट, हिंदुस्थान अँटीबायोटिक्स कंपनी, शिवाजीनगर शासकीय धान्य गोदाम यासह अन्य काही जागा मेट्रो स्टेशनसाठी संपादीत करण्यात येणार आहे. तसेच स्वारगेट येथे मेट्रोसाठी ‘इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट हब’ करण्यात येणार आहे यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादन करावी लागणार आहे. यापैकी बहुतेक ठिकाणी जागा देण्यास विरोध होत आहे. सरकारी मालकीची जागा असतानाही ती ज्या आस्थापनांच्या ताब्यात आहे, त्यांचा जागा देण्यास विरोध असल्यामुळे नागपूर मेट्रोच्या तुलनेत पुणे मेट्रोचे काम संथगतीने सुरू असल्याचे दिसते आहे. भूसंपादनालाच इतका वेळ जात असल्याने प्रत्यक्ष काम कधी सुरू होणार, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.परवानग्यांना अडचणी : नागपूर मेट्रोने टाकले मागेनागपूर आणि पुणे मेट्रोला २०१४ मध्ये एकाच दिवशी मान्यता मिळाली. पण त्यानंतर शासनाच्या स्तरावर व राजकीय पातळीवर नागपूर मेट्रो अत्यंत गतीने पुढे गेली. त्यातुलनेत पुणे मेट्रोचे काम अद्यापही संथगतीने सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. परवानग्या मिळण्यात अडचणी येत आहेत. पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटपर्यंतचा पहिला मेट्रो मार्ग १६.५८ किमीचा आहे. यात ११.५७ किमी मेट्रो उन्नत मार्गाने (रस्त्यावरून-एलिव्हेटेड) आहे. सुमारे सव्वा पाच किमी मेट्रो मार्ग भुयारी (अंडर ग्राऊंड) असणार आहे. उन्नत मार्गावर भूसंपादन करावे लागणार आहे. ।आस्थापनांचा विरोध जून अखेरपर्यंत मेट्रोसाठी आवश्यक ती जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मात्र आस्थापनांचा विरोध डावलून जागा ताब्यात घेणे सरकारलाही अवघड जाण्याची चिन्हे आहेत.