शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

मेट्रोची दरनिश्चिती समिती कागदावरच!

By admin | Updated: February 24, 2015 04:24 IST

मेट्रोचे दर निश्चित करण्यासाठी अद्यापही ‘फेअर फिक्सेशन कमिटी’ स्थापन झाली नसल्याची माहिती केंद्र शासनाच्या वतीने माहिती अधिकारान्वये दाखल केलेल्या अर्जावर देण्यात आली आहे.

मुंबई : मेट्रोचे दर निश्चित करण्यासाठी अद्यापही ‘फेअर फिक्सेशन कमिटी’ स्थापन झाली नसल्याची माहिती केंद्र शासनाच्या वतीने माहिती अधिकारान्वये दाखल केलेल्या अर्जावर देण्यात आली आहे. परिणामी, प्रवाशांना मेट्रोच्या १०, २०, ३० आणि ४० अशा तिकीटदरांना आणखी किती दिवस सामोरे जावे लागणार आहे, याबाबत प्रश्नचिन्हच आहे.जानेवारी महिन्यात केंद्रीय शहर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत एक बैठक झाली होती. या बैठकीनंतर निवृत्त न्यायमूर्ती पद्मनाभन यांच्या नेतृत्वाखाली ‘फेअर फिक्सेशन कमिटी’ स्थापन झाली आहे. आणि मेट्रोचे तिकीटदर कमी करण्यासाठी न्यायालयाकडे विनंती करण्यात येईल, अशी माहिती फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती. नेमके याच विषयाला केंद्रस्थानी ठेवून माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केंद्र शासनाकडे वेंकय्या नायडू यांच्यासमवेत झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तांची प्रत माहिती अधिकारान्वये उपलब्ध करून देण्यासाठीचा अर्ज केला. यावर केंद्रीय माहिती जनाधिकारी प्रकाश सिंह यांनी ‘फेअर फिक्सेशन कमिटी’ स्थापन करण्याचे आदेश जारी करण्यात आलेले नाहीत, असे अर्जदाराला कळविले.दरम्यान, केंद्रातील बैठकीला आज ४३ दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्याप ‘फेअर फिक्सेशन कमिटी’बाबत ठोस असा कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही. परिणामी, मेट्रोचे तिकीटदर १०, २०, ३० आणि ४० असे झाले असताना आणि बेस्टचे तिकीटदर वाढल्यानंतर मुंबईकरांच्या खिशाला झळच बसत आहे.त्यामुळे मेट्रोचा प्रवास मुंबईकरांना परवडण्याजोगा व्हावा म्हणून ‘मेट्रो अ‍ॅक्ट’ऐवजी पूर्वीचा ‘ट्रॉमवेज् अ‍ॅक्ट’ कार्यान्वित करण्यात यावा, अशा आशयाचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धाडण्यात आल्याचे अर्जदाराने प्रसारमाध्यमांना सांगितले. (प्रतिनिधी)