शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मेट्रो आवश्यक

By admin | Updated: May 4, 2017 05:19 IST

वाहतूककोंडीमुळे मुंबईकरांना होणारा त्रास लक्षात घेता मुंबईत मेट्रो आलीच पाहिजे. वाहतूककोंडी कमी करण्यासाठी मेट्रो-३ प्रकल्प

मुंबई : वाहतूककोंडीमुळे मुंबईकरांना होणारा त्रास लक्षात घेता मुंबईत मेट्रो आलीच पाहिजे. वाहतूककोंडी कमी करण्यासाठी मेट्रो-३ प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र याबरोबरच झाडाचे की मानवाचे आयुष्य जास्त महत्त्वाचे आहे, हे ठरवण्याचीही वेळ आली आहे, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मेट्रो-३ प्रकल्पासंदर्भातील निकाल बुधवारी राखून ठेवला.मेट्रो-३ प्रकल्पासाठी एमएमआरसीएल सुमारे पाच हजार झाडांची कत्तल करणार आहे. याविरुद्ध चर्चगेट व कफ परेडच्या रहिवाशांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणीत उच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी झाडांची कत्तल करण्यास स्थगिती दिली. त्यामुळे मेट्रो-३ प्रकल्पाचे काम रखडले आहे. त्यामुळे एमएमआरसीएलतर्फे ज्येष्ठ वकील अ‍ॅस्पी चिनॉय यांनी झाडांच्या कत्तलीला दिलेली स्थगिती हटवण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली.‘सार्वजनिक प्रकल्पावर स्थगिती दिल्याने मोठे आर्थिक नुकसान होत आहे. काही दिवसांवर पावसाळा आल्याने आता स्थगिती हटवली नाही, तर कामकाज चार महिने मागे पडेल. कामासाठी खड्डे खोदल्याने पावसाळ्यात मुंबईकरांच्या त्रासात भर पडेल. वाहतूककोंडीची शक्यता आहे. त्यामुळे झाडांच्या कत्तलीवर दिलेली स्थगिती हटवावी,’ अशी विनंती चिनॉय यांनी केली.ज्या ठिकाणावरील झाडे कापण्यात येतील, त्याच परिसरात एमएमआरसीएल काम पूर्ण झाल्यावर दुप्पट झाडे लावेल, अशी हमी देण्यासही तयार आहोत, असेही चिनॉय यांनी उच्च न्यायालयाला सांगितले.त्यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी आक्षेप घेत मेट्रो-३ प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने (एमओईएफ) परवानगी दिली नसल्याचे सांगितले.  आम्ही प्रकल्पावरील स्थगिती हटवल्यास एमएमआरसीएलने किती झाडे लावली, याची खात्री करण्यासाठी समिती नेमू, असे स्पष्ट करत न्यायालयाने स्थगिटी हटवण्यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला. (प्रतिनिधी)एमओईएफने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत मेट्रो-३ प्रकल्पासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट आॅथॉरिटीकडून (एमसीझेडएमए) परवानगी घेणे आवश्यक असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले.