शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो - ३ ला अखेर हिरवा कंदील

By admin | Updated: July 5, 2016 01:36 IST

मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि रिजेन्सी हॉटेल यांच्यातील जमिनीच्या वादामुळे कुलाबा ते सीप्झ हा मेट्रो-३ प्रकल्प खोळंबला होता. मात्र मुंबई विमानतळ, रिजेन्सी हॉटेल आणि

- दीप्ती देशमुख, मुंबई

मुंबई विमानतळ प्राधिकरण आणि रिजेन्सी हॉटेल यांच्यातील जमिनीच्या वादामुळे कुलाबा ते सीप्झ हा मेट्रो-३ प्रकल्प खोळंबला होता. मात्र मुंबई विमानतळ, रिजेन्सी हॉटेल आणि मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लि. (एमएमआरसीएल) मध्ये सामंजस्याने तोडगा निघाल्याने मेट्रो-३चा मार्ग मोकळा झाला आहे. पावसाळ्यानंतर मेट्रो-३चे काम सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.मुंबई विमानतळ आणि रिजेन्सी हॉटेलमध्ये ३१,००० चौ. मी. भूखंडावरून वाद सुरू आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. मात्र याच भूखंडातील एमएमआरसीएलला १४,३०४ चौ.मी. भूखंड भुयारी रेल्वेचे काम करण्यासाठी पाच वर्षांकरिता तात्पुरत्या स्वरूपी हवा आहे. तर १९६ चौ.मी. भूखंड व्हेंटिलेशन शाफ्ट, एन्ट्री, एक्झिट आणि फायर एक्झिटसाठी हवा आहे. त्यासाठी या दाव्यामध्ये एमएमआरसीएलने नोटीस आॅफ मोशन दाखल केले. यावरील सुनावणी न्या. एस.जे. काथावाला यांच्या खंडपीठापुढे होती.कुलाबा ते सीप्झ हा भुयारी मेट्रो-३ प्रकल्प ३३ कि.मी. लांबीचा आहे. विमानतळाजवळील टर्मिनस- २ येथून १२ कि.मी. जमिनीखालून मेट्रो धावणार असल्याने रिजेन्सीने येथे आपल्याला पार्किंगसाठी तळघर उभारण्यास परवानगी देण्यात येणार नाही, अशी भीती उच्च न्यायालयाकडे व्यक्त केली.परंतु, सोमवारच्या सुनावणीत एमएमआरसीएलच्या वकील किरण बघालिया यांनी एमएमआरसीएल पार्किंगसाठी तळघर बांधण्यास आक्षेप घेणार नाही. पण मेट्रो लाइनच्या सुरक्षेबाबत घालण्यात आलेल्या निकषांच्या अधीन राहूनच परवानगी देण्यात येईल, अशी हमी न्यायालयाला दिली. तसेच ज्याला उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वादग्रस्त जमिनीचा ताबा मिळेल, त्याला नुकसानभरपाईची रक्कम देण्याची तयारी एमएमआरसीएलची आहे, अशीही माहिती अ‍ॅड. बघालिया यांनी न्यायालयाला दिली.मुंबई विमानतळ प्राधिकरण, रिजेन्सी हॉटेल आणि एमएमआरसीएल यांच्यामध्ये या मुद्द्यांवरून एकवाक्यता झाल्याने अखेरीस उच्च न्यायालयाने एमएमआरसीएलचे नोटीस आॅफ मोशन निकाली काढत मेट्रो-३चा मार्ग मोकळा केला. मेट्रो-३ कुलाबा ते सीप्झ धावणार असून, यामुळे दक्षिण मुंबई थेट विमानतळाला जोडली जाणार आहे. एकूण २७ स्टेशन्स प्रस्तावित असून, तीन स्टेशन्स विमानतळाच्या परिसरातच असणार आहेत. (प्रतिनिधी) दक्षिण मुंबई विमानतळाला जोडली जाणारमेट्रो-३मुळे दक्षिण मुंबई थेट विमानतळाला जोडली जाणार आहे. एकूण २७ स्टेशन्स प्रस्तावित असून, तीन स्टेशन्स विमानतळाच्या परिसरातच असणार आहेत. उच्च न्यायालयाने मेट्रो-३ला हिरवा कंदील दाखविल्याने पावसाळ्यानंतर या प्रकल्पास सुरुवात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली