शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मीटरने चला, अन्यथा कारवाई

By admin | Updated: July 20, 2014 01:12 IST

उपराजधानीत आॅटोरिक्षांना ई-मीटर बसविण्याची मुदत मागील वर्षी ३० जूनला संपली. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (शहर) वारंवार कारवाईचा बडगा उभारला, परंतु वर्षे होऊनही अनेक

आरटीओ : १०० आॅटोंवर कारवाई नागपूर : उपराजधानीत आॅटोरिक्षांना ई-मीटर बसविण्याची मुदत मागील वर्षी ३० जूनला संपली. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (शहर) वारंवार कारवाईचा बडगा उभारला, परंतु वर्षे होऊनही अनेक आॅटोचालक मीटरने चालत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आरटीओने मागील दोन दिवसांपासून धडक मोहीम हाती घेतली आहे. आतापर्यंत १०० आॅटोरिक्षांवर कारवाई करण्यात आली असून यातील ३० आॅटो जप्त करण्यात आले आहेत. शहरात १९९० पासून ते आतापर्यंत पाचवेळा आॅटोचालकांना मीटरने चालण्याची सक्ती करण्यात आली. परंतु,प्रत्येकवेळा ती बारगळली, हे विशेष. सध्याच्या स्थितीत शहरात ९ हजार २५५ आॅटोरिक्षांचे परवाने देण्यात आले आहेत. मागील वर्षी या आॅटोंवर इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्याची सक्ती आरटीओने केली होती. यामुळे साधारण ८५ टक्के आॅटोंमध्ये ई-मीटर बसविण्यात आले. शहरातील आॅटो मीटरने चालण्यासाठी आरटीओने वेळोवेळी सूचना केल्या. आॅटो संघटनांच्या बैठकीत तशी माहिती दिली. परंतु आॅटोरिक्षा मीटरने चालण्यास तयार होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या. आरटीओने याची गंभीर दखल घेत ही मोहीम हाती घेतली. मागील दोन दिवसापासून चार वायु पथकाच्यामदतीने आॅटो तपासणी सुरू करण्यात आली. यात आतापर्यंत ७१ आॅटोंना नोटीस देण्यात आले, तर ३० आॅटो जप्त करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी सांगितले, आॅटो मीटरने चालावा हा नियम आहे. प्रवाशाच्या मागणी नंतरही आॅटो मीटरने चालत नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जात आहे. यात एका आॅटोवर १५०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. सध्याच्या स्थितीत सव्वा लाख रुपये यातून महसूल गोळा करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)