शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाळुशिल्पातून स्वच्छ भारत अभियानाचा संदेश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 02:14 IST

स्वच्छ भारत अभियानाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त महात्मा गांधीजींना गिरगाव चौपाटी येथे वालुकाशिल्पाद्वारे आदरांजली वाहण्यात आली.

मुंबई : स्वच्छ भारत अभियानाच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त महात्मा गांधीजींना गिरगाव चौपाटी येथे वालुकाशिल्पाद्वारे आदरांजली वाहण्यात आली. जागतिक कीर्तीचे वालुका शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी हे शिल्प तयार केले आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डातर्फे गिरगाव चौपाटी येथे स्वच्छ भारत अभियान आणि निर्मल सागर तट अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी वालुकाशिल्प साकारण्यात आले आहे. स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांसाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डातर्फे गेले १५ दिवस सुरू असलेल्या निर्मल सागर तट अभियानाचा वालुकाशिल्प साकारून समारोप करण्यात आला. वालुकाशिल्प साकारण्याआधी चौपाटीची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांच्यासह नागरिक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.सुदर्शन पटनाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे १० ट्रक वाळू वापरून १० फूट उंच व ४० फूट रुंद असे भव्य वालुकाशिल्प साकारले आहे. तिरंग्यासह विविध रंगांत साकारलेले हे वालुकाशिल्प गांधी जयंतीपासून नागरिकांना पाहण्यासाठी खुले करण्यात आले आहे. सुदर्शन पटनाईक निर्मल सागरी तट अभियानाचे ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर असून, त्यांनी कोकण किनाऱ्यांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली आहे. किनारपट्टी स्वच्छ ठेवण्यासाठी वालुकाशिल्पाद्वारे संदेश देत असल्याचे पटनाईक यांनी सांगितले.