शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त वसाहत योजनेतून ‘स्वयंरोजगार स्वयंघरी’चा संदेश

By admin | Updated: July 6, 2014 23:27 IST

८0 कुटुंबांना लाभ : जमीन हस्तांतरणाची कार्यवाही पूर्ण

वाशिम : विकासापासून कोसो दूर असलेल्या भटक्या विमुक्त समाजातील भुमिहीन, बेघर व गोरगरीब कुटूंबांना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेने आपल्या दारिद्रयावर मात करण्याचा आशेचा किरण दाखविला आहे. जिल्हयातील चार गावातील प्रत्येक २0 याप्रमाणे ८0 कुटूंबांची आवश्यक त्या मुलभुत सुविधांसह स्वतंत्र वसाहत निर्माण करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. या मोहिमेतून ह्यस्वयंरोजगार स्वयंघरीह्णचा संदेश दिला जाणार आहे.विमुक्त जाती, भटक्या जमातीतील दुर्बल कुटूंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने ह्ययशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनाह्ण हा महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. वाशिम जिल्हयात जिल्हास्तरीय समितीने दीड वर्षांपूर्वी भटक्या विमुक्तांची अधिक लोकवस्ती असलेल्या मेडशी, किन्हीराजा, पोहरादेवी व फुलउमरी या चार गावांची निवड केली होती. या चार गावांमधून प्रत्येकी २0 याप्रमाणे ८0 कुटूंबांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. मध्यंतरी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आणि त्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारंसहिता असल्याने गोरगरीब लाभार्थींची स्वतंत्र वसाहत निर्माण करण्याच्या कामाला ब्रेक लागले होते. आचारसंहिता संपताच लाभार्थी निवडही पार पडली. ८0 कुटुंबांना स्वतंत्र घरकुल व वसाहत निर्माण करण्याबरोबरच स्वयंरोजगार देण्याचेही या योजनेत प्रस्तावित राहणार आहे. दीड वर्षांपूर्वी या चारही गावात शासनाच्या पाच एकर जागेची पाहणी करण्यात आली होती. जिल्हास्तरीय चमूने जागेची निवड केल्यानंतर या जागेच्या मोजणीसाठी २0१३ च्या जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात भूमिअभिलेखच्या खात्यात आवश्यक ते शुल्कही जमा करण्यात आले होते. जमिन हस्तांतरणाची कार्यवाही पार पडल्यानंतर जमिन मोजणी आणि आता लाभार्थी निवडीची कार्यवाहीदेखील पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे ८0 कुटुंबांना राहण्यासाठी घर आणि उदरनिर्वाहासाठी स्वयंरोजगार मिळण्याच्या अपेक्षा आहेत.** मुक्त वसाहत योजनेतून स्वतंत्र वसाहत निर्मितीविमुक्त जाती व भटक्या जमातीमधील भूमिहीन, बेघर कुटूंब, एका लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले, यापुर्वी घरकुल योजनेचा लाभ न घेतलेले व महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या लाभार्थींची या योजनेत जिल्हास्तरीय समितीने निवड केली आहे.प्रत्येक गावातील २0 कूटुंबाची पाच एकरावर स्वतंत्र वसाहत शासनाकडून मोफत तयार केली जाणार आहे. प्रत्येक कुटूंबाला पाच गुंठे क्षेत्रफळ दिले जाईल. यावर घर बांधून दिले जाईल तसेच उर्वरीत जागा स्वयंरोजगारासाठी वापरता येणार आहे. जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया झाली आहे.