शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यंगचित्रांद्वारे पाणी वाचवण्याचा संदेश

By admin | Updated: May 16, 2016 03:41 IST

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘कार्टुनिस्ट कम्बाइन संस्थे’ने व्यंगचित्रांद्वारे पाणी वाचवण्याचा संदेश दिला आहे.

डोंबिवली : राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘कार्टुनिस्ट कम्बाइन संस्थे’ने व्यंगचित्रांद्वारे पाणी वाचवण्याचा संदेश दिला आहे. संस्थेने येथील आनंद बालभवनमध्ये दोन दिवसांचे व्यंगचित्र प्रदर्शन भरवले आहे. त्याचा प्रारंभ शनिवारी झाला. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन पाहता येईल.गणेश जोशी यांच्या पुढाकाराने भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रातील आणि इंदूर, दिल्ली येथील ५० व्यंगचित्रकारांची १०० व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत. १९७२ मध्ये महाराष्ट्रात असाच भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा शिवसेनाप्रमुख व व्यगंचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांनी दुष्काळाची दाहकता दाखवणारे व्यंगचित्र रेखाटले होते. ते व्यंगचित्र या प्रदर्शनात पाहता येईल. प्रदर्शनाच्या सुरुवातीस हे व्यंगचित्र मांडले आहे. त्याचबरोबर मंगेश तेंडुलकर, गणेश जोशी, प्रभाकर वाईरकर, व्ही.ए. हसबनीस, सुरेश सावंत, निलेश जाधव, श्रीनिवास प्रभुदेसाई, सुधाकर सोनी आदी प्रसिद्ध व्यंगचित्रकारांची व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत. याशिवाय, लहानगे व्यंगचित्रकार प्रथमेश काटकर आणि श्वेता शेवाळे यांचीही व्यंगचित्रे आहेत. (प्रतिनिधी)