शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

साठ हजार विद्यार्थ्यांना प्रवेशाचा संदेश

By admin | Updated: July 28, 2016 01:23 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना बुधवारी उपसंचालक कार्यालयाने प्रवेश घेण्यासाठी

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केलेल्या ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना बुधवारी उपसंचालक कार्यालयाने प्रवेश घेण्यासाठी मेसेज पाठवले आहेत. चार गुणवत्ता यादीत नाव आल्यानंतरही महाविद्यालयात ७० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नव्हते. त्यापैकी ६० हजार ७९४ विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांत जागा रिक्त असल्याचा उल्लेख केलेला मेसेज पाठवला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. दरम्यान, उरलेल्या सुमारे ९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९ आॅगस्ट रोजी नव्याने आॅनलाइन अर्ज नोंदणी करून प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. तर प्रवेशाचा मेसेज पाठवलेल्या विद्यार्थ्यांना गुरुवारपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. जे विद्यार्थी प्रवेश निश्चित करणार नाहीत, त्यांनाही ९ आॅगस्ट रोजी नव्याने नोंदणी करून विशेष फेरीत प्रवेशाची आणखी एक संधी मिळणार आहे.याआधी अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइनच्या एकूण २ लाख ६९ हजार ७७२ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १ लाख ५० हजार २३४ जागा आॅनलाइन पद्धतीने, तर १ लाख १९ हजार ५३८ जागा अल्पसंख्याक, इन हाऊस, व्यवस्थापन कोट्यातून भरण्यात येणार होत्या. या जागांसाठी या वर्षी एकूण २ लाख २२ हजार ६२२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र त्यातील केवळ १ लाख ५३ हजार ३२६ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला होता. त्यामुळे १ लाख १६ हजार ४४६ जागा रिक्त राहिल्या होत्या. त्यातील ६० हजार ७९४ जागांसाठी नॉट रिपोर्टेड विद्यार्थ्यांना मेसेज पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे यांमधील किती विद्यार्थी पुन्हा प्रवेश घेणार, याची माहिती गुरुवारनंतरच समोर येईल. (प्रतिनिधी)विशेष फेरीसाठी ५० हजार जागाअद्यापही अर्धवट अर्ज भरलेल्या सुमारे चार हजार विद्यार्थ्यांसाठी जाहीर होणाऱ्या पाचव्या गुणवत्ता यादीसाठी सुमारे ५५ हजार ६५२ जागा रिक्त आहेत. त्यामुळे मेसेज पाठवलेले नॉट रिपोर्टेड विद्यार्थी आणि पाचव्या गुणवत्ता यादीतील सर्वच विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यानंतरही ९ आॅगस्ट रोजी होणाऱ्या विशेष फेरीसाठी ५० हजारांहून अधिक जागा रिक्त राहत असल्याचे निदर्शनास येते.उपसंचालक कार्यालयात शांततागेल्या आठवडाभरापासून शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर पालक व विद्यार्थ्यांची धुमश्चक्री सुरू होती. मात्र बुधवारी या ठिकाणची पालक व विद्यार्थ्यांची गर्दी ओसरली होती.प्रवेशासाठी उपसंचालक कार्यालयाने केलेल्या मेसेजमुळे बहुतांश विद्यार्थी व पालक शांत झाल्याचे दिसले. तरी यापुढील प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळतील, अशी अपेक्षा उपसंचालक कार्यालयाने व्यक्त केली.