शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाचा ‘पारा’ वाढला!

By admin | Updated: February 17, 2017 02:48 IST

राज्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांसाठी आज अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदान झाले. उन्हाचा पारा चढलेला असतानादेखील

मुंबई : राज्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांसाठी आज अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदान झाले. उन्हाचा पारा चढलेला असतानादेखील त्याची तमा न बाळगता मतदारांनी अक्षरश: रांगा लावून मतदान केले. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असून, सरासरी ६९ ते ७० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. आजवर या निवडणुकीत सरासरी ५८ ते ६५ टक्के मतदान होत असे.जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी सकाळी ७.३० ला अत्यंत उत्साहाच्या वातावरणात मतदानाला सुरुवात झाली. मतदार याद्यांमधील घोळ, अनेकांची नावे गहाळ असणे, यामुळे काही जिल्ह्यांमध्ये गोंधळाची परिस्थितीही दिसून आली. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमधील १ हजार ७१२ जागांसाठीच्या उमेदवारांचे भवितव्य मशिनबंद झाले आहे. निर्णय २३ फेब्रुवारीला होईल.जळगाव जिल्हा परिषद निवडणुकीत मतदार यादीत नावे नसल्याने अनेक ठिकाणी घोळ झाले. त्यामुळे तणाव निर्माण झाले होते. तामसवाडी ता. पारोळा येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता. तामसवाडी हे गाव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांचे गाव आहे. दुसरीकडे भुसावळ तालुक्यात आमदार संजय सावकारे व ग्रामस्थांमध्ये वाद झाला. आव्हाणे, नशिराबाद या दोन गावांमध्ये तर काहीवेळ मतदानाची प्रक्रिया थांबवावी लागली होती. केंद्रप्रमुखाचा मृत्यू झाडी ता. अमळनेर येथील निवडणूक केंद्रप्रमुख लक्ष्मण बाविस्कर (३५) यांचा बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. आचारसंहिता भंगाविषयी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर दबाव टाकल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानबुलडाणा : जिल्ह्यात दोन ठिकाणी वधु-वरांनी लग्नाआधी मतदानाचा अधिकार बजावला. मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे-लिहा सर्कल येथील सचिनसिंग राजपूर या युवकाने गुरुवारी सकाळी मतदान केले व त्यानंतर तो बोहल्यावर चढला. असाच प्रकार लोणार तालुक्यातील नांद्रा येथे घडला. आश्रुबा माणिकराव मुंढे यांची मुलगी अनिताने लग्नाच्या दिवशी आधी मतदानाचा हक्क बजावला व त्यानंतरच ती लग्न मंडपात गेली. परभणीतील राणीसावरगाव (ता. गंगाखेड) येथील व्यापारी मारोतीअप्पा धुळे यांचे चिरंजीव अमोल धुळे यांनीही दुपारी विवाहाला जाण्यापूर्वी वाजत-गाजत वरातीसह मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.