शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचा पारा ३५ वरून ३३ अंशावर

By admin | Updated: May 2, 2017 05:11 IST

चैत्रानंतर सुरू झालेल्या वैशाख वणव्यादरम्यान वातावरणात बदल होत असून मुंबईचा पारा ३५ वरून ३३ अंशावर गेला आहे

मुंबई : चैत्रानंतर सुरू झालेल्या वैशाख वणव्यादरम्यान वातावरणात बदल होत असून मुंबईचा पारा ३५ वरून ३३ अंशावर गेला आहे. राज्यात ठिकठिकाणी गारांचा मारा सुरू असून, मराठवाड्यासह विदर्भात सातत्याने गारांसह पाऊस पडत असून, २ मे रोजी विदर्भातील काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडेल तर उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदवण्यात आले आहे. जळगाव, मालेगाव, परभणी, नांदेड, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या शहरांचे कमाल तापमान अद्याप ४० अंशावर नोंदवण्यात येत आहे, तर दुसरीकडे मुंबईचे कमाल तापमान सातत्याने ३५ अंश नोंदवण्यात येत होते. आता मात्र, मुंबईच्या कमाल तापमानात २ अंशांची घसरण झाली आहे. मुंबईचे कमाल ३३ अशांवर घसरले आहे.दरम्यान, मुंबईच्या कमाल तापमानात दोन अंशाची घसरण झालीआहे. मुंबईकरांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी तापमानात घसरण होऊनही येथे उष्ण आणि कोरडे वारे मोठ्या प्रमाणात वाहत आहेत. शिवाय उकाडाही कायम आहे. वाहणाऱ्या या कोरड्या, उष्ण वाऱ्यांमुळे मुंबईकर घामाघूम  होत असून, मंगळवारसह बुधवारी मुंबईचे कमाल व किमान तापमान अनुक्रमे ३४, २५ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (प्रतिनिधी)