शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
4
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
5
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
6
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
7
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
8
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
9
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
10
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
11
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
12
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
13
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
14
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
15
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
16
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा ६ विषयांत झाला फेल तरी पालकांनी कापला केक, कारण...
17
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
18
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
19
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
20
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."

पारा ४२ अंशांवर

By admin | Updated: May 23, 2015 23:04 IST

परिसरातील तापमानाचा पारा ४२ डिग्रीपर्यंत पोहोचला. या वाढत्या तापमानाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

बारामती : परिसरातील तापमानाचा पारा ४२ डिग्रीपर्यंत पोहोचला. या वाढत्या तापमानाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्य समस्यामध्ये वाढ झाली आहे. विशेषत: लहान मुलांना उष्णतेचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. डोळा, त्वचा रोगाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. उष्णतेमुळे पुरळ येणे, उष्णतेचे विविध विकार, त्वचाविकार, उलट्या, पित्ताचा त्रास, डोकेदुखी, सर्र्दी याबरोबरच अतिसाराचे प्रमाण विविध रुग्णांमध्ये दिसून येत आहे. त्वचारोगतज्ज्ञ डॉ. दीपिका कोकणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले, की वाढत्या तापमानामुळे हातपाय, चेहऱ्यावर पांढरट चट्टे निर्माण होत आहेत. काही काळाने हे चट्टे लाल होताना दिसत आहेत. तसेच, ‘सनबर्न’चा त्रास जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. उष्णता वाढल्याने चेहऱ्यावर फोड येणे, वांग येणे यांसारखे त्वचाविकार आढळतात. उष्णतेचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी आहाराची काळजी घ्यावी. मांसाहार, तेलकट अन्न टाळावे. उन्हाचा संपर्क टाळावा. उन्हात फिरताना स्कार्फ, सनकोट, सनस्क्रीन लोशनचा वापर करावा. लिंबू, कोकम सरबतसारख्या पेयाचे सेवन करावे.तर, डॉ. चदं्रकांत पिल्ले यांनी सांगितले, की वाढत्या उन्हात फिरणे टाळावे. भरपूर पाणी प्यावे. जलयुक्त आहार या काळात अधिक घ्यावा. आयुर्वेदाच्या वापराने उष्णतेच्या विकारांवर नियंत्रण मिळविणे शक्य आहे.बालरोगतज्ज्ञ डॉ. भास्कर जेधे यांनी सांगितले, की लहान मुलांमध्ये वाढत्या उष्णतेमुळे जुलाब, उलट्या, ताप, चिडचिड करणे, पोटदुखी, हालचाल मंदावणे आदी त्रास दिसून येत आहे. लहान मुलांना नेहमीपेक्षा अधिक पाणी पाजणे, सावलीत, मोकळ्या हवेत खेळवणे. गार, कोमट पाण्याने त्यांचे अंग पुसावे.‘ पॅक फुड’ देणे टाळावे. फळे, हलके ताजे घरगुती अन्न लहान मुलांना द्यावे.नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सचिन कोकणे यांनी सांगितले, की डोळ्यामध्ये कोरडेपणा वाढलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. कोरडेपणामुळे डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज सुटणे आदी त्रास जाणवतो. डोळ्याच्या पडद्याचे विकार, मांस येणे आदी त्रास जाणवणारे रुग्ण आढळून आले आहेत. (वार्ताहर)बारामती : बारामती आणि इंदापूर तालुक्यात मागील चार ते पाच दिवसांपासून उष्णतेचा कडाका वाढला आहे. तालुक्यातील तापमानाचा पारा ४२ वर पोहोचला आहे. अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे दुधाळ जनावरांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. जनावरांची दूध उत्पादनक्षमता घटली आहे. जनावरांमध्ये तिवा रोगाचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे. सध्या तालुक्याला उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेचा फटका जनावरांच्या आरोग्यालाही बसत आहे. परिणामी दुधाळ जनावरांची दूध उत्पादनक्षमता घटली आहे. उन्हामुळे जनावरांमध्ये तीव्र ताप, डेंग्यू, तिवा आदी रोगांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. दूध उत्पादक शेतकरी जनावरांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष देत आहे. तिवा या आजारामध्ये जनावरांना तीव्र ताप येतो. तसेच बाधित जनावर खाणे-पिणे बंद करते. यामध्ये तातडीने योग्य उपचार न मिळाल्यास जनावरे दगावण्याचीही भीती असते. पारा वाढल्याने जनावरांनाही उष्माघाताचा धोका वाढला आहे. त्यासाठी जनावरांना दिवसातून चार वेळा स्वच्छ थंड पाणी पाजणे गरजेचे आहे. तसेच रात्री १० ते ११च्या दरम्यान पाणी पाजल्याने जनावरांना उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो. सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. वाढलेल्या उष्णतेचा सर्वाधिक त्रास म्हशींना होत आहे. त्यासाठी दुपारच्या वेळी पाण्याने भिजवलेले गोणपाट म्हशींच्या अंगावर टाकल्याने उष्णतेचा त्रास कमी होऊ शकतो. तसेच जनावरांना सावलीच्या ठिकाणी बांधावे.- डॉ. डी. के. घुले, पशुधन पर्यवेक्षकवाढलेल्या उष्णतेमुळे जनावरे दुपारच्या वेळी धापा टाकत आहेत. सावलीच्या ठिकाणी जनावरे बांधली तरी लागणाऱ्या झळांमुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच ओला चारा कमी असल्याने दूध उत्पादनातही घट झाली आहे. - राहुल नलवडे, शेतकरी, कर्दनवाडीक्षारांमुळे परिणामतालुक्यातील काही भागात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे जनावरांना क्षारयुक्त पाणी पाजावे लागत आहे. क्षारयुक्त पाण्यामुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात येत आहे.