मुंबई : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि समाजसेवक कमरुद्दीन मर्चंट यांच्या कार्याची आठवण म्हणून जोगेश्वरी पश्चिमेकडील के-पश्चिम विभागात बांधण्यात आलेले ‘कमरुद्दीन मर्चंट मनोरंजन मैदान’ नागरिकांसाठी खुले करण्यात आले. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी खासदार गुरुदास कामत यांच्या हस्ते मैदानाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि प्रभाग क्रमांक ५७ चे काँग्रेसचे नगरसेवक देवेंद्र आंबेरकर यांच्या प्रयत्नांंनी जोगेश्वरी पश्चिमेकडील कॅप्टन सावंत मार्गावरील भूखंडावर हे सुसज्ज मैदान/उद्यान साकारण्यात आले आहे. येथे व्यायामाचे साहित्य, खेळणी आणि बैठक व्यवस्थेसह जॉगिंग ट्रॅकच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत, असे आंबेरकर यांनी सांगितले. लोकार्पण सोहळ्याला मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस ताज मोहम्मद, महेश मल्लिक, नगरसेविका वनिता मारुचा, जिल्हा अध्यक्ष गफूर खान, संजीव कल्ले, मोबिन पठाण, सित्तानंद शिंगे, अलाहुद्दीन बडगुजर, खालिद शेख, उमर मोहम्मद सय्यद, श्रवण गायकवाड, नासिर अन्सारी, शौकत विराणी, विकी गुप्ता, क्लाईव्ह डायस, जुबेर फारूखी आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जोगेश्वरी येथील मर्चंट मैदान खुले
By admin | Updated: July 31, 2016 01:51 IST