शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषांच्या भावनांनाही हवे मोकळे आकाश!

By admin | Updated: May 20, 2017 02:45 IST

आपल्या समाजात पुरुषप्रधान संस्कृती आहे. मात्र आजही समाजात पुरुषांना मोकळे होण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी भक्कम यंत्रणेचा अभाव आहे. ही पोकळी भरून

- स्नेहा मोरे । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आपल्या समाजात पुरुषप्रधान संस्कृती आहे. मात्र आजही समाजात पुरुषांना मोकळे होण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी भक्कम यंत्रणेचा अभाव आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी आजच्या काळात सर्व क्षेत्रांत म्हणजे अगदी शिक्षण, आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, चित्रपट-नाट्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सक्षम व्यासपीठ आपण तयार केले पाहिजे. जेणेकरून, त्या माध्यमातून पुरुष संवाद साधून मोकळे होऊ शकतील, असे मत ‘मेन अगेन्स्ट व्हायोलन्स अ‍ॅण्ड अ‍ॅब्युज’ संस्थेचे संस्थापक हरीश सदानी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. आपल्या समाजात खूप पूर्वीपासून पुुरुषप्रधान सत्ता असल्याने कायदे बदलणे शक्य नाही. कारण आपल्या समाजात बहुसंख्य वर्गाकडून ‘स्त्री’ पीडित आहे. त्यामुळे या कायद्यांमध्ये बदल होण्यापेक्षा त्यात नव्याने तरतुदी करणे शक्य आहे. जेणेकरून अमेरिकेप्रमाणे आपल्याकडेही लिंग निरपेक्ष कायदा तयार होईल. पुरुषांवर होणारा अन्याय हा दबावामुळे अधिकाधिक वाढत जातो, यावर तोडगा म्हणून ‘त्या’ पुरुषांची मानसिक कोंडी फोडण्यासाठी आजूबाजूच्या व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधणे जरुरी आहे. त्यांच्यासोबत कुणीतरी आहे अशी भावना त्यांच्या मनात निर्माण केली पाहिजे, असे सदानी यांनी आवर्जून सांगितले.पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाच्या अनेक तक्रारी आमच्याकडे येतात. त्या वेळी पीडित पुरुषासोबत त्याच्या कुटुंबीयांचे समुपदेशन करण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागते. या वेळी कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना त्या समुपदेशनाच्या प्रक्रियेत अनेक अडथळे येतात. नकार, क्रोध, त्रागा अशा अनेक भावनांना पार करत खूप कालावधीनंतर ही प्रक्रिया हळूहळू सुलभ होत जाते. बऱ्याचदा अशीही परिस्थिती उद्भवते ज्या वेळी ती व्यक्ती आत्महत्या करत असते म्हणजेच उदाहरणार्थ, रेल्वे रुळांवर किंवा गळफास लावण्याच्या तयारीत असते आणि मग हेल्पलाइनवर कॉल येतो अशा परिस्थितीतही त्या पीडित पुरुषाशी रात्रभर संवाद साधून त्याला आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यात येते, असे मत ‘वास्तव’च्या समुपदेशिका इंदरबिर कौर यांनी व्यक्त केले. (समाप्त)अटक थांबवलीसर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये एका सुनावणीदरम्यान घरगुती हिंसाचार कायद्याविषयी महत्त्वाचा निर्णय दिला होता. त्या निर्णयात पत्नीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर पतीची होणारी त्वरित अटक थांबविण्यात आली. त्यामुळे प्रकरणाचा तपास केल्यानंतर काही हाती आल्यास त्यानंतर पतीला अटक करावी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामुळे पतीची सरसकट होणारी अटक टळल्याचे कौटुंबिक न्यायालयाचे विधिज्ञ अ‍ॅड. परेश देसाई यांनी सांगितले.