शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कर्ता पुरुष अडकल्याने घरातील चूल बंद!

By admin | Updated: September 22, 2016 22:08 IST

दोन दिवस झाले आमच्या घरी चूल पेटलेली नाही़ कोणत्याही प्रकारची चूक नसताना कर्ता पुरुष अटकेत असल्याने आमच्यावर संकट कोसळले आहे़

ऑनलाइन लोकमतधुळे, दि. २२ : दोन दिवस झाले आमच्या घरी चूल पेटलेली नाही़ कोणत्याही प्रकारची चूक नसताना कर्ता पुरुष अटकेत असल्याने आमच्यावर संकट कोसळले आहे़ जीवन जगायचे कसे, लहान मुलांना सांभाळायचे कसे, असा यक्ष प्रश्न निर्माण झालेला आहे़ या संदर्भात पालकमंत्र्यांपुढे कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला तर आमचे म्हणणे ऐकून न घेता दुर्लक्ष केल्याची कैफियत अटकेतील शेतकरी कुटुंबातील महिलांनी व्यक्त केली़ या वेळी त्यांनी आपल्या अश्रूंना वाट करून दिली़ दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी बैठकीपूर्वी बंद खोलीत अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली़

अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या प्रश्नावरुन मंगळवारी शेतकऱ्यांनी आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेकही केली. यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली़ ही बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बंद खोलीत पार पडली़ त्यात पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते़ बंद खोलीत बैठक झाल्याने त्यात काय चर्चा झाली, हे मात्र कळू शकले नाही.

असे असले तरी या बैठकीत मंगळवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात विचारविनिमय झाला असल्याचे सांगण्यात आले़ या बैठकीनंतर नियोजन सभागृहात धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसोबत बैठक झाली़ या वेळी जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधीक्षक चैतन्या एस़, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, सिंचन विभागाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते़

बैठकीत सुरुवातीस पालकमंत्री म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयावरील दगडफेकप्रकरणी पोलीस प्रशासन सीसीटीव्हीचे उपलब्ध असलेले फुटेज पाहून निर्णय घेतील़ दगडफेकीत ज्यांचा समावेश नाही, त्या व्यक्तींची नावे मागे घेण्याबाबत पोलीस प्रशासन कार्यवाही करेल़ शेतकऱ्यांच्या भावनांशी आपण सहमत आहोत़ या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचविल्या जातील़ त्यानंतर निर्णय घेतला जाईल़ असे सांगून डाव्या कालव्याचे काम सात दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले़ २५ वर्ष होऊनदेखील काम मार्गी लागत नाही़ आमच्यावर संकट कोसळले असताना आम्ही कोणाकडे दाद मागायची? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला़ पालकमंत्र्यांना युवक कॉँग्रेसचा घेरावआंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी पालकमंत्री दादा भुसे यांना युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी घेराव घालण्यात आला़ राज्यात सरकारच्या दुटप्पी भुमिकेमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे़ शेतकऱ्यांना कांदा ५ पैसे दराने विकण्याची वेळ आलेली आहे़ असे असताना अक्कलपाडा प्रकल्पातील पाणी डाव्या कालव्याने मिळावे म्हणून आंदोलन करणाऱ्या शेतकरी, शेतमजुरांवर लाठीहल्ला करण्यात आला. शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे़ प्रशासनाकडून लेखी आश्वासन देण्यात येऊनही काम मार्गी लागलेले नाही़ तातडीने डाव्या कालव्याचे काम पूर्ण करावे आणि आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी या वेळी करण्यात आली़ युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नीलेश काटे, प्रभादेवी परदेशी, गायत्री जयस्वाल, योगिता पवार, बानू शिरसाठ, सतीश रवंदळे, डॉ़ कैलास सोनवणे, हरीश पाटील, मुबीन अन्सारी, अबुलास खान, रफीक शाह, योगेश विभुते, मसूद सरदार, महेश कालेवार, सरवर अन्सारी, राजू कर्पे, मोहसीन तांबोळी, नाजनीन शेख, शोएब अन्सारी, रिदवान अन्सारी आदी या वेळी उपस्थित होते.