शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

महापौर बंगल्यात शिवसेना प्रमुखांचे स्मारक

By admin | Updated: February 27, 2017 19:27 IST

समुद्र किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या दादर पश्चिम येथील महापौर बंगल्याच्या जागेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आज

मुंबई, दि. 27 - समुद्र किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या दादर पश्चिम येथील महापौर बंगल्याच्या जागेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव आज अखेर महापालिकेच्या मावळत्या महासभेत मंजूर करण्यात आला. सत्ता स्थापनेचा निर्णय अधांतरी असल्याने शिवसेनेने हा प्रस्ताव तातडीने मंजूर केला. मात्र यामुळे आतापर्यंत या बंगल्याचे यजमान असलेल्या महापौरांचे नवीन निवासस्थान भायखळ्यातील राणीच्या बागेत हलविण्यात येण्याची शक्यता आहे.शिवसेना प्रमुखांच्या भव्य स्मारकासाठी शिवाजी पार्क येथील महापौर बंगलाच उत्तम जागा ठरेल, यावर सर्वांचे एकमत झाले. त्यानुसार महापौर बंगल्याचा भूखंड बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक सार्वजनिक न्यास हस्तांतरीत करण्याचा प्रस्ताव सुधार समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. मात्र त्यानंतर लगेचच आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे हा प्रस्ताव निवडणुकीच्या काळापर्यंत लांबणीवर पडला. मावळत्या सभागृहाची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात येत आहे. तत्पूर्वी आज हा प्रस्ताव शिवसेनेने बहुमताने मंजूर करुन घेतला.महापौर बंगला राणीच्या बागेत?हा प्रस्ताव महापालिकेच्या महासभेतही मंजूर झाल्यामुळे आता महापौर बंगला स्मारक न्यासकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र यामुळे पुढच्या आठवड्यात निवडून येणाऱ्या नवनिर्वाचित महापौरांना शासकीय निवासस्थान मिळण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे़ नव्या महापौरांचे शासकीय निवासस्थान म्हणून भायखळा येथील प्रसिद्ध राणीच्या बागेतील बंगल्याची निवड करण्यात आली आहे. राणीची बाग सोयीचीदादर येथील आकर्षक स्थळांपैकी एक असा महापौर बंगला परदेशी पर्यटकांसाठीही आकर्षण ठरले आहे़ पुरातन वास्तू असलेल्या या बंगल्याला समुद्र किनाऱ्याचे नैसर्गिक वरदान लाभले आहे. साडेचार हजार चौ. फ़ुटांमध्ये असलेला हा आकर्षक बंगला म्हणजे महापौरपदाच्या शानमध्ये चारचाँदच़ तसेच मध्यवर्ती ठिकाणं असल्याने दादरमधील हा बंगला महापालिकेचे कार्यक्रम व बैठकांसाठीही सोयीचा ठरत असे़ ही जागा स्मारकासाठी दिल्यानंतर मध्यवर्ती ठिकाण व तक्रार घेऊन जाणाऱ्या मतदारांसाठी सोयीचे ठिकाण म्हणून भायखळा येथील राणीची बागच उत्तम ठरणार आहे. असे आहे महापौरांचे नवीन निवासस्थानभायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रहालयातील नवीन बंगला सहा हजार चौरस फुटांचा आहे़ गेल्या दीड वर्षांपासून हा बंगला रिकामी असून नुकतीच त्याची डागडुजी करण्यात आली आहे़ त्यामुळे हा बंगला महापौर निवासस्थानासाठी देण्याचा विचार सुरु आहे़ मात्र याबाबत अद्याप प्रस्ताव आलेला नाही़