शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

स्मारकाचा खर्च १६६ कोटींनी वाढला, कामास विलंब झाल्याचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 05:24 IST

दादरमधल्या इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामास २३ महिन्यांचा विलंब झाल्यामुळे स्मारकाच्या खर्चात १६६ कोटींची वाढ झाली आहे.

मुंबई : दादरमधल्या इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामास २३ महिन्यांचा विलंब झाल्यामुळे स्मारकाच्या खर्चात १६६ कोटींची वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत स्मारकासाठी ५९१ कोटी रुपये अंदाजित खर्च येणार असून, यासाठी मेसर्स शशी प्रभू अ‍ॅण्ड असोसिएट्स यास आतापर्यंत ३.४४ कोटी देण्यात आले आहेत. दरम्यान, स्मारकाचे भूमिपूजन झाले तेव्हा शासनाने यासाठी ४२५ कोटी खर्च येणार असल्याचे म्हटले होते.माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून माहिती अधिकाराखाली प्राप्त कागदपत्रातून ही माहिती समोर आली आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरमधल्या इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्या वेळी राज्य शासनाने ४२५ कोटी खर्च येणार असल्याची माहिती दिली होती.>अंदाजित खर्च ५९१ कोटींचाएमएमआरडीएने माहिती अधिकार कार्यकर्त्यांना दिलेल्या माहितीनुसार, इंदू मिल येथील स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ ४८४१४.८३ चौरस मीटर आहे. या जागेचा ताबा एमएमआरडीएने शासनाच्या वतीने २५ मार्च २०१७ रोजी घेतला. स्मारकाच्या बांधकामासाठी १४ एप्रिल २०१७ रोजी रचना व बांधकाम या तत्त्वावर निविदा मागविण्यात आल्या. निविदेसंबंधी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्मारकाचे काम सुरू होईल. यासाठी सुमारे ५९१ कोटी रुपये इतका अंदाजित खर्च येईल. या कामासाठी शासनाने आर्किटेक्ट मेसर्स शशी प्रभू अ‍ॅण्ड असोसिएट्सची नियुक्ती केली आहे. संबंधिताला आतापर्यंत ३.४४ कोटी रक्कम देण्यात आली आहे. स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ आॅक्टोबर २०१५ रोजी करण्यात आले होते.