शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

चारही नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होणार?

By admin | Updated: February 5, 2016 04:00 IST

ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, विक्रांत चव्हाण आणि सुधाकर चव्हाण यांचे नगरसेवकपद धोक्यात

अजित मांडके,  ठाणेठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे, नजीब मुल्ला, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे सुधाकर चव्हाण यांचे नगरसेवकपद धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राज्य सरकारने त्यांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती राज्य सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिली.आधीच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यापुढील अडचणी वाढल्या असतानाच, ठाण्यातही त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांवर आता पद गमावण्याची टांगती तलवार आहे.बीपीएमसी अ‍ॅक्टमधील सेक्शन १३ अ‍ॅक्टनुसार निवडून आलेल्या नगरसेवकाने कामात कुचराई केली, गैरकृत्य वा अशोभनीय वर्तन केले, तर अशा नगरसेवकाचे पद रद्द करण्याचा ठराव पालिका तीन चतुर्थांश मतांनी मंजूर करून, राज्य सरकारला शिफारस करू शकते. ठराव मंजूर झाल्याच्या तारखेपासून नगरसेवकपद रद्द होते. या कलमानुसार, नगरसेवकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन राज्य सरकारही कारणे दाखवा नोटीस बजावू शकते. प्रस्तुत प्रकरणात चारही नगरसेवकांवर आरोपपत्र दाखल झाले असून, त्यामध्ये त्यांनी परमार यांची छळवणूक केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे नगरविकास विभागाने या नगरसेवकांना तुमचे नगरसेवकपद रद्द का करू नये, अशा नोटिसा बजावण्याची तयारी सुरू केली आहे. अल्पावधीत या नोटिसा त्यांच्या हाती पडतील. त्यावर त्यांना आपले म्हणणे सरकारपुढे मांडता येईल व त्यानंतर सरकार नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेईल. परमार हत्येप्रकरही चारही नगरसेवकांना पोलिसांनी अटक केली. चौघांवर पोलिसांनी न्यायालयात ३०४९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. वारंवार जामिनासाठी प्रयत्न सुरू असताना अद्यापही त्यांच्यातील एकालाही जामीन मिळालेला नाही. या चारही नगरसेवकांचे पद रद्द झाले, तर तो राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला मोठा धक्का असेल. कारण वर्षभरानंतर ठाणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत.