शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

खासदार चंद्रकांत खैरेंवर अखेर गुन्हा दाखल

By admin | Updated: November 3, 2015 04:08 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बजाजनगरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविताना तहसीलदारांसह अधिकाऱ्यांना ‘शिवसेना स्टाईल’ हिसका दाखविणे खा. चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बजाजनगरातील धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविताना तहसीलदारांसह अधिकाऱ्यांना ‘शिवसेना स्टाईल’ हिसका दाखविणे खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट यांना अखेर चांगलेच महागात पडले. सोमवारी या दोन्ही नेत्यांसह ३० ते ४० शिवसैनिकांविरुद्ध पोलिसांनी अजामीनपात्र गुन्हा नोंदविला. आरोपींना लवकरच अटक होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली.पोलिसांनी शिवसेना नेत्यांवर गुन्हा नोंदविताच महसूल अधिकारी - कर्मचारी संघटनेने खैरेंच्या कृतीविरोधात उपसलेले आंदोलनाचे हत्यार म्यान केले. संप मागे घेऊन सोमवारी दुपारनंतर महसूल अधिकारी, कर्मचारी कामावर हजर झाले. न्यायालयाच्या आदेशानुसार २८ आॅक्टोबरला पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने सहा धार्मिक स्थळे हटविण्यास सुरुवात केली. चार मंदिरांचे अतिक्रमण हटविल्यानंतर संत शिरोमणी नरहरी मंदिराचे अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू असतानाच खा. खैरे, आ. शिरसाट दुपारी तीन वाजेच्या सुमारास सेनेच्या कार्यकर्त्यांसह तेथे पोहोचले. शिवसैनिकांनी अतिक्रमण हटाव पथकाला रोखले. तहसीलदारांना शिवीगाळ, धक्काबुक्कीखा. खैरे यांनी तहसीलदार रमेश मुंडलोड यांचे वाहन अडविले आणि त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली होती. त्याचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले. खैरे यांनी कारवाईबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्यावरही टीका केली होती. त्यामुळे महसूल अधिकारी, कर्मचारी संतापले. शनिवारी निवासी जिल्हाधिकारी आर. बी. राजपूत तसेच उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, तलाठी संघ आदींसह महसूल कर्मचाऱ्यांनी खैरेंविरोधात पोलिसांत तक्रार दिली. मात्र, गुन्हा दाखल न केल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी ३१ आॅक्टोबरपासून संप सुरू केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले. मंगळवारपासून संपूर्ण मराठवाडाभर आंदोलनाचा कर्मचाऱ्यांचा प्रयत्न होता. मात्र त्यापूर्वीच शिवसेना नेत्यांवर गुन्हा नोंदविण्याचा निर्णय झाला. (प्रतिनिधी)फरक पडणार नाही... हिंदुत्व रक्षण ही सेनेची भूमिका आहे. जेव्हा-जेव्हा हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर हल्ले झाले, तेव्हा सेनाच रस्त्यावर उतरली आहे. मी केलेले वक्तव्य मुजोर प्रशासना-विरोधात होते. त्यावर मी ठाम आहे. मी कुठल्याही कारवाईला घाबरणाऱ्यांपैकी नाही. असे अनेक गुन्हे माझ्यावर आहेत. मला काही फरक पडणार नाही. - खा. चंद्रकांत खैरे