शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाट अंधारात

By admin | Updated: January 23, 2015 01:54 IST

महावितरणने ४५ लाखांची थकबाकी अदा न केल्याने मध्य प्रदेशने गुरुवारी पहाटे ६ वाजेपासून मेळघाटातील ४५ गावांचा वीजपुरवठा खंडित केला आहे़

मध्य प्रदेशची कारवाई : ४५ आदिवासी गावांची वीज कापलीनरेंद्र जावरेल्ल चिखलदरा (जि़ अमरावती)महावितरणने ४५ लाखांची थकबाकी अदा न केल्याने मध्य प्रदेशने गुरुवारी पहाटे ६ वाजेपासून मेळघाटातील ४५ गावांचा वीजपुरवठा खंडित केला आहे़ परिणामी ही सर्व गावे अंधारात बुडाली आहेत. अमरावती जिल्ह्यातील धारणी व चिखलदरा तालुक्यांना मध्य प्रदेशातून, तर मुक्तागिरी व परिसरात महाराष्ट्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. दोन्ही राज्यांतून समन्वयाने हा पुरवठा सुरू आहे. परंतु महावितरणने ४५ लाख रुपयांची थकबाकी न भरल्याने चिखलदरा तालुक्यातील जारिदा सबस्टेशनचा वीजपुरवठा मध्य प्रदेशातून खंडित केला आहे. त्यामुळे काटकुंभ - चुरणी-जारिदा परिसरातील ४५ गावांतील आदिवासींवर अंधारात राहण्याची वेळ आली आहे. तर देयके भरण्यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असून, वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अचलपूरचे महावितरणचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गिरी यांनी स्पष्ट केले़ वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा योजना, दळण यंत्र बंद आहेत. तर दुसरीकडे शेतीचे ओलीत थांबले आहे. पुरवठा बंद राहिल्यास पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.आमचा दोष काय?आम्ही आमची वीज बिले अदा केली आहेत. आमचा दोष काय़? महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका आदिवासी शेतकऱ्यांना बसत आहे. झालेल्या पिकांची नुकसानभरपाई महावितरणने द्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसचे पीयूष मालवीय, राहुल येवले, अमोल बोरेकार, गौरव काळे आदींनी दिला आहे. थकबाकी २२ जानेवारीपर्यंत ४४ लाख ८८ हजार रुपये भरण्याचा अल्टीमेटम महावितरणला देण्यात आला होता. तरी कुठलेच पाऊल उचलण्यात आले नाही़ परिणामी वीजपुरवठा खंडित केल्याचे भैसदेही येथील शाखा अभियंता अरविंद डहटिया यांनी सांगितले.