शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेहतांची लोकायुक्तांकडून तर देसार्इंची स्वतंत्र चौकशी - मुख्यमंत्र्यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 05:04 IST

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची राज्याच्या लोकायुक्तांमार्फत तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची स्वतंत्र (इंडिपेंडन्ट) चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळाच्या उभय सभागृहात केली.

मुंबई : गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांची राज्याच्या लोकायुक्तांमार्फत तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची स्वतंत्र (इंडिपेंडन्ट) चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधिमंडळाच्या उभय सभागृहात केली.मात्र दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे घेण्यास त्यांनी ठामपणे नकार दिला. सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची ज्येष्ठ सनदी अधिकारी व आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी समिती (एसआयटी)मार्फत चौकशी करण्याबाबत फडणवीस यांनी आश्वस्त केले.विरोधी पक्षाच्यावतीने मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली. फडणवीस म्हणाले की, मेहता यांच्या बाबतीत एम.पी. मिल कंम्पाऊंड प्रकरणातील फाईल पुढे सरकली नाही व विकासकाला एलओआय देण्यात आला नाही. ही जमीन मूळात संरक्षण खात्याची असून देखभालीकरिता राज्य सरकारला दिली होती. १९९९ पासून २०१२ पर्यंत या योजनेत तत्कालीन राज्य सरकारने वेगवेगळ््या परवानग्या दिल्या आहेत. २००९ मध्ये विकासकाने २० चौ.मी. ऐवजी २५ चौ.मी.चा लाभ देण्याची मागणी सरकारकडे केली होती. त्यावेळी प्रत्यक्ष जमिनीवर इमारत उभी राहिल्याने या अतिरिक्त चटईक्षेत्राचा लाभ होऊ शकत नाही हे मंजुरी देणाºयांना माहित होते. मात्र तरीही मंजुरी दिली गेली. ही जागा महापालिकेच्या ताब्यात देण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे सर्वच गोष्टींची चौकशी करावी लागेल, असे ते म्हणाले.सुभाष देसाई यांनी मोठी जमीन गैर अधिसूचित केल्याच्या आरोप होत असला तरी ज्या जमिनीबाबत हे आरोप होत आहेत त्या ठिकाणचे १६ हजार ९०९ हेक्टर क्षेत्र गैर अधिसूचित झाले असून त्यापैकी ९ हजार ३३५ हेक्टर क्षेत्र जुन्या सरकारने गैर अधिसूचित केले आहे. जमीन संपादन कायद्याच्या ३२ (१) या नियमाखाली (विनावापरातील) मागील सरकारने २२८७ हेक्टर क्षेत्र गैर अधिसूचित केले असून विद्यमान सरकारने ३१.५४ हेक्टर क्षेत्र गैर अधिसूचित केले आहे. त्यापैकी ३० हेक्टर क्षेत्र हे न्यायालयाच्या आदेशावरुन गैर अधिसूचित केलेले आहे. देसाई यांच्यावरील आरोपांची स्वतंत्र चौकशी केली जाईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.भोसरी येथील जी जमीन आपण खरेदी केली नाही ती ५० वर्षांपूर्वी संपादित केली होती. राज्य सरकार एवढे उदार झालेच आहे तर ती जेमतेम ३ एकर जमीन मोकळी करणार का, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, खडसे यांची मागणी तपासून पाहू.समता नगरबाबतही मेहतांवर आरोप झाल्याचे नमूद करुन मुख्यमंत्री म्हणाले की, घाटकोपर व कांदिवली या दोन ठिकाणी एकाच नावाची वस्ती असून मेहता यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिलेले पत्र घाटकोपर समतानगरबाबत होते. त्यामुळे मेहतांवरील आरोपांची लोकायुक्तांमार्फत चौकशी केली जाणार आहे.विरोधकांनी देसाई यांची चौकशीही लोकायुक्तांमार्फत करण्याची व दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. देसाई यांच्याबाबतच्या प्रकरणांसंबधी लोकायुक्तांशी आपली चर्चा झालेली नाही. ती करुन निर्णय घेऊ, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.येवले प्रकरणातही चौकशी : माहिती अधिकमार कार्यकर्ते संदीप येवले यांना विकासकाने दिलेल्या रकमेबाबत व त्या रकमेतील काही रक्कम त्यांनी आमदारांना दिल्याच्या प्रकरणाचीही आर्थिक गुन्हे शाखा आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामार्फत चौकशी करण्यात येईल, असे फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले.