शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नवविवाहितेकडून आत्महत्याग्रस्त कुटुंबास ‘मेहर’ची रक्कम सुपूर्द !

By admin | Updated: May 8, 2016 16:50 IST

लातुरात एका नवविवाहितेने आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मेहरची रक्कम देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 8- मुस्लिम समाजात नववधूला वराकडून देण्यात येणाऱ्या मेहरच्या रक्कमेवर वधूचा हक्क असतो. या मेहरची रक्कम बहुतांश वधू मस्जिद, मदरसा किंवा एखाद्या गरीब कुटुंबाला देतात अथवा स्वत:साठी खर्च करतात. मात्र लातुरात एका नवविवाहितेने आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मेहरची रक्कम देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. लातुरातील सामाजिक कार्यकर्ते मोहसीन खान यांची मुलगी सानेहा हिचा विवाह इंडिया नगर येथील असद हबीबसाब शेख यांच्याशी देवणी येथे झालेल्या इज्तेमामध्ये झाला. या लग्नसोहळ्यात वर असदकडून वधू सानेहा हिस महेर म्हणून ५ हजार ५१ रुपये देण्यात आले होते. गेल्या आठ दिवसांपासून महेरची रक्कम एखाद्या गरीब, होतकरु कुटुंबाला देण्याबाबत सानेहाने आपल्या वडिलासह पतिसोबत चर्चा केली. मात्र तिला एक घटना आठवली ती म्हणजे लातूर तालुक्यातील भीसे वाघोली येथील हुंड्याच्या कारणावरुन आत्महत्या केलेल्या मोहिनी भिसेची़ हुंड्याच्या कारणासाठी ज्या मोहिनीला आपले जिव संपवावे लागले. तिच्या कुटुंबियाला ही महेरची रक्कम देण्याची इच्छा सानेहाने व्यक्त केल्यानंतर, पती असद हबीबसाब शेख, वडिल मोहसीन खान यांनी क्षणाचाही विलंब न लावता यासाठी प्रोत्साहन दिले. वडिलांनी या रकमेत ५ हजारांची भर घालून आपल्या घरी बोलवून मोहिनीची आई कांताबाई, वडिल पांडुरंग भिसे यांच्याकडे रविवारी एकूण १० हजार ५१ रुपये सुपूर्द केले आहे. या माध्यमातून सानेहाने समाजातील अन्य मुलींसमोर एक आगळा वेगळा आदर्श ठेवला आहे.