शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

मेघवाडीत पोलिसांची मुक्ताफळे

By admin | Updated: July 22, 2016 03:26 IST

जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरामध्ये लाइट नसल्याने आम्ही पेट्रोलिंग करू शकत नाही.

गौरी टेंबकर-कलगुटकर,

मुंबई- जोगेश्वरीच्या मेघवाडी परिसरामध्ये लाइट नसल्याने आम्ही पेट्रोलिंग करू शकत नाही. त्यामुळे घरफोड्या होतात, त्यात पोलिसांची काय चूक? असे आश्चर्यकारक वक्तव्य मेघवाडी पोलिसांनी एका बैठकीच्या वेळी स्थानिकांसमोर केले. त्यामुळे स्थानिकांच्या जखमेवर फुंकर मारण्याऐवजी पोलिसांनी त्यावर मीठ चोळल्याने स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.१६ जुलैच्या रात्री मेघवाडीत सात घरफोड्या झाल्या. त्यामुळे मेघवाडीतील संतप्त स्थानिकांनी पोलीस ठाण्यावर रविवारी मोर्चा काढला. या मोर्चावेळी मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी या प्रकरणी स्थानिकांशी चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानुसार, १८ जुलै रोजी शामनगर परिसरात आयोजित बैठकीला मेघवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पांडुरंग पाटील आणि त्यांच्या तीन-चार सहकाऱ्यांव्यतिरिक्त कोणीच उपस्थित राहिले नाही.चोरी झालेल्या सर्व तक्रारदारांच्या दु:खात मी सहभागी आहे. जोगेश्वरीतील बहुतांश चाळीत वीज नसते. त्यामुळे रात्री कोणताही पोलीस अधिकारी गस्त घालण्यासाठी गल्लीत येऊ शकत नाही. त्यासाठी सामान्य जनतेतून पुढाकार घेत, काही लोकांनी रात्रीची गस्त घालण्यासाठी पोलिसांना मदत करावी, असे आवाहन पांडुरंग पाटील यांनी या वेळी स्थानिकांना केल्याची माहिती, समाजसेविका सुरक्षा घोसाळकर यांनी ‘लोकमत’ला दिली.जोगेश्वरीमध्ये चोरीचे आणि गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. कारण मेघवाडी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, तसेच उपलब्ध पोलीस कर्मचाऱ्यांपैकी ६० टक्क्यांहून अधिक कर्मचाऱ्यांनी चाळीशी गाठली आहे. त्यामुळे ते चोरांचा पाठलाग करू शकत नाही, असाही मुद्दा या वेळी पोलिसांनी मांडल्याचे घोसाळकर यांनीसांगितले.कोणीही पोलीस कर्मचारी जोगेश्वरीमध्ये बदली करून घेण्यास तयार होत नाही. नागरिकांनी पोलिसांना समजून घ्यावे. वर्दीच्या आत एक माणूस असतो. घरफोडीच्या घटनेच्या तपासाबद्दल आता समर्पक उत्तर देता येणार नाही. याबाबत वरिष्ठच बोलू शकतील, असे म्हणत पोलिसांनी आमच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.>दवे कम्पाउंडमध्ये चोरीच्या घटनांत वाढ होत आहे.गणेश मैदान, श्याम तलावाच्या मागील रस्त्यावर अश्लील प्रकार चालतात.कोकण नगर आणि करकरे उद्यानाच्या मागील रस्त्यावर अश्लील शेरेबाजी सुरू असते; त्यामुळे महिलांना येथून जाताना अडचणी येतात.लाल बहादूर चाळ परिसरात मद्यपींचा वावर अधिक असतो.शिवटेकडी आणि सर्वोदयनगर परिसरात खुलेआम अमलीपदार्थांची विक्री होते.>तक्रारदारांना धमकीमेघवाडी परिसरात अमलीपदार्थांची खुलेआमपणे विक्री केली जाते. याची स्थानिकांनी वारंवार तक्रार केली आहे. मात्र जी व्यक्ती तक्रार करते; त्याची माहितीच ड्रग्स पेडर्सला मिळते. परिणामी, संबंधितांकडून तक्रारदाराला जीवे मारण्याची धमकी दिली जाते.