शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आज तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2017 01:09 IST

उपनगरीय रेल्वेमार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वेमार्गावरील मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : उपनगरीय रेल्वेमार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा, रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वेमार्गावरील मुलुंड ते माटुंगा अप धिम्या मार्गावर तसेच हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी, वांद्रे स्थानकांदरम्यान अप-डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेमार्गावरही मरिन लाइन्स ते माहीम स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक असणार आहे. मध्य मार्गावर मुलुंड-माटुंगा स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावरील लोकल अप जलद मार्गावरून चालविण्यात येतील. परिणामी, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांत लोकलला थांबा देण्यात येणार असल्यामुळे या लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत. हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी ९.५२ ते दुपारी ४.३९ वाजेपर्यंत सीएसटी ते चुनाभट्टीदरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील लोकल सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नाहीत. त्याचबरोबर सीएसटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा सकाळी १०.३८ ते दुपारी ४.१३ वाजेपर्यंत बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातील फलाट क्रमांक ८ वरून विशेष पनवेल लोकल धावतील.पश्चिम मार्गावर जम्बोब्लॉकपश्चिम रेल्वेवर मरिन लाइन्स ते माहीम स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, अप-डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक अप-डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. यामुळे महालक्ष्मी, एलफिन्स्टन रोड आणि माटुंगा रोड स्थानकात लोकल थांबणार नाहीत. जम्बोब्लॉकमुळे पश्चिम मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.