शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनाध्यक्ष आज ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 02:30 IST

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उद्या, २२ रोजी उस्मानाबादमध्ये होणाऱ्या बैठकीत आगामी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडला जाणार ...

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या उद्या, २२ रोजी उस्मानाबादमध्ये होणाऱ्या बैठकीत आगामी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडला जाणार आहे. याच बैठकीत संमेलनाच्या तारखा आणि तीन दिवसीय कार्यक्रम पत्रिकाही जाहीर केली जाणार आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी फादर फ्रॉन्सिस दिब्रिटो यांचे नाव पुढे आले आहे. या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.संमेलनाध्यक्षपदासाठी घटक, सामाविष्ट आणि संलग्न संस्थांकडून वेगवेगळ्या नावांची यादी महामंडळातर्फे मागविली जाते. मात्र बैठकीपूर्वीच यादीतील नावांची चर्चा होते. त्यामुळे ही चर्चा टाळण्यासाठी आणि नावे गोपनीय ठेवण्यासाठी यंदा बैठकीच्या दिवशीच चार घटक संस्थांनी प्रस्तावित नावे बैठकीत द्यायची असा बदल केला आहे. बैठकीत शक्यतो बहुमतानेच अध्यक्ष निवडीवर भर दिला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. रविवारी बैठकीनंतर दुपारी महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील पत्रकार परिषदेत नव्या अध्यक्षांच्या नावाची घोषणा करतील.फादर फ्रॉन्सिस दिब्रिटोंच्या नावाची चर्चा उस्मानाबाद येथे होणाºया संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी फादर फ्रॉन्सिस दिब्रिटो यांच्या नावाची चर्चा आहे. तसेच ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे, ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांची नावेही चर्चेत आहेत.