शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहा आणि उद्धव ठाकरेंमध्ये झाली बैठक

By admin | Updated: October 31, 2014 19:51 IST

शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात वानखेडे स्टेडियममध्ये बैठक झाल्याचे वृत्त असून या बैठकीत शिवसेनेच्या पाठिंब्याविषयी चर्चा झाल्याचे समजते.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ३१ - भाजपा आणि शिवसेनेमध्ये सुरु असलेली तणातणी शुक्रवारी झालेल्या शपथविधी सोहळ्यामुळे संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. शपथविधी सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात वानखेडे स्टेडियममध्ये बैठक झाल्याचे वृत्त असून या बैठकीत शिवसेनेच्या पाठिंब्याविषयी चर्चा झाल्याचे समजते. 

विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची २५ वर्ष जुनी युती तुटल्यानंतर या दोन्ही पक्षांमधील मतभेद दिवसेगणिक वाढत आहेत. भाजपाने सर्वाधिक जागा पटकावत सरकार स्थापन केले असले तरी बहुमतासाठी भाजपाला आणखी २२ आमदारांचा पाठिंबा लागणार आहे. मात्र मंत्रिपद आणि खातेवाटपावरुन दोन्ही पक्षांमध्ये समाधानकारक तोडगा निघू शकलेला नाही. भाजपा नेत्यांनी शिवसेनेला महत्त्वाची खाती देण्यास नकार दिल्याने तणाव आणखीन वाढला. याची परिणती म्हणजे शिवसेनेने भाजपा सरकारच्या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. अखेर दिल्लीतील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंनी फोनवर चर्चा केली व उद्धव ठाकरे या सोहळ्याला उपस्थित राहिले.

उद्धव ठाकरे सपत्नीक उपस्थित राहिल्याने भाजपाला दिलासा मिळाला आहे. विधानसभेत विश्वास दर्शक ठरावात भाजपाला शिवसेनेची गरज भासू शकते. यापार्श्वभूमीवर शपथविधी सोहळ्यानंतर अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चेला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या चर्चेचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही.