शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जतमध्ये तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक

By admin | Updated: June 29, 2016 02:40 IST

तालुका क्रीडा संकुलाची बैठक आमदार तथा तालुका क्रीडा संकुल समिती अध्यक्ष सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

कर्जत : तालुका क्रीडा संकुलाची बैठक आमदार तथा तालुका क्रीडा संकुल समिती अध्यक्ष सुरेश लाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी जिल्हा कार्यालयात ४ मार्च २०१५ रोजी सविस्तर चर्चा होऊन कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे जागेची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून अंदाजपत्रक व आराखडे तयार करून शासन मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. त्यासाठी शासनाने २५० लाख रु पयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी दिली होती. मात्र ही जागा मिळण्यास गावकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याने ही जागा समितीच्या ताब्यात मिळाली नाही. मात्र २५ मे २०१६ च्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार कर्जत तालुक्यातील मौजे वांजळे येथील गुरचरण जमिनीपैकी एक हेक्टर जागा संकुलासाठी देण्यात आली. नवीन जागेच्या अनुषंगाने नवीन अंदाजपत्रक आराखडे तयार करून शासनाच्या प्रशासकीय मान्यतेस प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.संकुल उभारणीचे काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केल्यास दर्जेदार व वेळेत प्रकल्प पूर्ण होत नसल्याचा अनुभव आहे. यामुळे वास्तुविशारदाकडून तालुका क्रीडा संकुलाचे अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्याचे तसेच आराखड्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मान्यता घेऊन आणि वेळोवेळी प्रकल्पाच्या कामाची तपासणी करूनच प्रकल्प पूर्ण करण्याचे सर्वानुमते या बैठकीत ठरले. (वार्ताहर)>प्रस्ताव सादर करणारशासनाची ३ हेक्टर ०६ आर जमीन संकुलासाठी उपलब्ध होण्यासाठी प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी तहसीलदार तथा तालुका क्रीडा समिती कार्याध्यक्ष रवींद्र बाविस्कर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, कर्जत नगरपरिषद प्रतिनिधी कनिष्ठ अभियंता नीलेश चौडीये आदी उपस्थित होते.