मुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर आज पहिल्यांदाच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष पदाधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत राज काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष्य होते. मात्र, ३१ मे रोजी मुंबईत एक सभा घेत राज पक्षाची भूमिका स्पष्ट करतील, असे पक्षाचे शिशिर शिंदे यांनी सांगितले. दादर येथील मनसेचे पक्ष मुख्यालय राजगड येथे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार, आमदार आणि पदाधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणे शोधली गेली. या निकालाबाबत राज यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच सर्व उमेदवारांना आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
राज ठाकरेंची ३१मे रोजी सभा
By admin | Updated: May 21, 2014 03:43 IST