शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राष्ट्रवादी नगरसेवकांची बैठकीस दांडी

By admin | Updated: September 19, 2016 01:20 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीस २२हून अधिक नगरसेवक गैरहजर होते.

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चिंचवड येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीस २२हून अधिक नगरसेवक गैरहजर होते. या विषयी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘‘पक्षाचीबैठक असताना असे काय काम होते, की ते २२ नगरसेवक बैठकीस आले नाहीत. पक्ष त्यांना महत्त्वाचा वाटत नाही, अशांंना याचा जाब विचारा, अशा सूचना तटकरे यांनी शहरप्रमुखांना केल्या.तानाजीनगर, चिंचवड येथील सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली. या वेळी प्रदेशाध्यक्षांसह महापौर शकुंतला धराडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समिती अध्यक्ष डब्बू आसवानी, महिलाध्यक्षा सुजाता पालांडे, माजी महापौर मोहिनी लांडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेते हनुमंत गावडे, नारायण बहिरवाडे, नाना काटे, शिक्षण मंडळाचे सभापती निवृत्ती शिंदे आदी उपस्थित होते. या आढावा बैठकीस महापौर धराडे आणि झामा बारणे वगळता आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक बहुतांश नगरसेवकांनी दांडी मारली होती. या विषयी तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘सत्ता हेच उद्दिष्ट असणारे लोक सत्तेबरोबर राहतात. आपल्याला ज्या पक्षाने पद, प्रतिष्ठा दिली त्यांना विसरू नये.’’सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम आणि शहराध्यक्ष वाघेरे यांनी भाजपाकडून होणाऱ्या टीकेचा समाचार घेतला. वाघेरे म्हणाले, ‘‘मूर्तीखरेदीचे भांडवल केले जात आहे. विनाकारण टीका केलीजात आहे. पंचवीस लाखांच्या निविदेत २४ लाखांचा भ्रष्टाचार कसा काय होऊ शकतो?’’ (प्रतिनिधी)>गटबाजीमुळे नुकसानगटबाजीमुळे पक्षाचे नुकसान होत आहे, हा मुद्दा माजी आमदार विलास लांडे यांनी मांडला. ते म्हणाले, ‘‘मार्केटिंग करण्यात आपण कमी पडलो. नेते आले, की काही लोक येतात. दिशाभूल करण्याचे काम केले जाते. बैठकांना सर्वांना बोलवायला हवे. एकजूट करायला हवी. प्रभागांचे असंख्य तुकडे केले आहेत, ही बाबही गांभीर्याने घ्यावी. पक्षाच्या नावावर मोठे झाले ते आता कोठे गेले. सर्वांना बरोबर घेऊन काम करायला हवे. पक्षाबरोबर नसणारांना आपलेच लोक मदत करतात. भोसरीतील कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण होऊ नये, याची दक्षता नेत्यांनी घ्यावी.’’