शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

नमामी चंद्रभागाची उद्या पुण्यात बैठक

By admin | Updated: July 11, 2016 21:01 IST

इंद्रायणी आणि भीमा नदीतीच्या प्रदूषणाबाबत नमामी गंगेच्या धर्तीवर शासनाने नमामी चंद्रभागा अभियान सुरू केले

शिवाजी सुरवसे/ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 11- इंद्रायणी आणि भीमा नदीतीच्या प्रदूषणाबाबत नमामी गंगेच्या धर्तीवर शासनाने नमामी चंद्रभागा अभियान सुरू केले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नदीकाठच्या विविध गावच्या मलनित्सारण योजना आणि पाणीपुरवठा योजनेचा आराखडा केला असून ३५२ कोटींच्या या आराखड्यात विविध कामांचा समावेश आहे़ पाणीपुरवठा, स्वच्छता व पर्यावरण मंत्री बबनराव लोणीकर यांनी या अभियानाबाबत जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख अधिकाऱ्यांची १३ जूलै रोजी दुपारी १२ वाजता पुण्यात बैठक आयोजित केली आहे़ जिल्ह्यातील सर्व आमदार,खासदार तसेच पुणे आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी, पुणे, पिंपरीचिंचवड, सोलापूर महापालिकेचे आयुक्त, पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसीचे पुणे आणि सोलापूरचे अधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना या बैठकीस बोलाविले आहे़ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हा संभाव्य आराखडा तयार केला आहे़ नदीच्या तिरावर असलेली गावे त्यांची आत्ताची लोकसंख्या, २०१७ ची लोकसंख्या आणि २०३२ ची लोकसंख्या याचा विचार करुन भीमा नदीत घाण पाणी मिसळू नये यासाठी नियोजन केले जात आहे़ वास्तविक पाहता पुण्यातील नद्यातूनच दूषित झालेले पाणी उजनी धरणात मिसळते त्यामुळे तेथील प्रदूषण रोखणे हे खूप मोठे काम आहे़ सोलापूर जिल्ह्यातील प्रदूषणापेक्षा भीमा नदी पुणे जिल्ह्यातच जास्त प्रदूषित होते़ नदीकाठचे उद्योग, कारखाने यांचे देखील दूषित पाणी मोठ्या प्रमाणावर नदीत मिसळते त्यामुळे या प्रदूषणावर आळा बसविणे खूप मोठे काम आहे़ नमाची चंद्रभागा अभियानासाठी २० कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे़ दशक्रिया विधीपासून ते उद्योगाचा प्रदूषण रोखण्यापर्यंत आणि पुण्यातून उजनी धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रदूषण रोखणे महत्त्वाचे आहे़ सध्या गटारगंगेप्रमाणे अत्यंत घाण पाणी पुण्यातून भीमानदीत मिसळते ही वस्तुस्थिती सर्वांना माहित आहे़................................या प्रमुख कामांचा समावेश-उजनी धरणापासून भीमा नदीच्या दोन्ही तिरावरील ११३ गावासाठी नांदेड पॅटर्नप्रमाणे सांडपाणी व्यवस्थापन योजना करणे-१२४ कोटी रुपये-गोपाळपूर, वाखरी, लक्ष्मी टाकळी, भटूंबरे, शेगाव दुमाला व आढीव गावांसाठी पाणीपुरवठा व मलनि:सारण योजना करणे-८६ कोटी-पंढरपूर शहरात २४ तास आणि ७ दिवस पाणीपुरवठा करण्यासाठी विविध कामे करणे-६३ कोटी-पंढरपूर शहरात भुयारी गटारी योजना टप्पा क्रमांक ३ करणे -६५ कोटी -चंद्रभागा नदीच्या पश्मिच तिरावर दशक्रिया विधी घाट बांधणे- १५ कोटी रुपये