शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

कचरा उचलायलाही बैठक पे बैठक!

By admin | Updated: July 22, 2016 02:38 IST

औद्योगिक वसाहतींत ठिकठिकाणी साचलेला कचरा, राडारोडा तत्काळ साफ करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतरही अद्याप तो जैसे थे आहे.

कल्याण : डोंबिवली आणि अंबरनाथच्या औद्योगिक वसाहतींत ठिकठिकाणी साचलेला कचरा, राडारोडा तत्काळ साफ करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतरही अद्याप तो जैसे थे आहे. एमआयडीसीच्या हद्दीतील कचरा पालिकेने उचलायचा कसा, त्याचा खर्च कोण देणार, या मुद्द्यावर गाडे अडले असून त्यासाठी पालिका-एमआयडीसी अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. डोंबिवली-अंबरनाथच्या प्रदूषणाचा विषय हरित लवादाने उचलून धरल्यावर नेमक्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भेट दिली होती, तेव्हा त्यांनी हे आदेश दिले होते. त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नसल्याने कचरा आहे, त्याच जागेवर पडून आहे. तो एमआयडीसीने उचलायचा की महापालिकेने, याविषयी अद्याप एकमत झालेले नाही. बदलापूर-शीळ रस्त्यालगतही त्यांना कचरा आढळला होता. हाच कचरा औद्योगिक परिसरातील नाल्यात टाकला जातो. त्यामुळे नाले तुंबतात. आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. हा कचरा तातडीने हटवण्याचे आदेश कदम यांनी दिले होते. डोंबिवलीतील औद्योगिक कारखान्यांचा परिसर पालिका हद्दीत आला असला, तरी त्यातील काही भागासाठी एमआयडीसी नियोजन प्राधिकरण आहे. तेथे सुविधा पुरवण्याचे काम एमआयडीसीचे आहे. मात्र, एमआयडीसी ते करत नाही. आलेला निधी त्यांच्याकडून खर्च केला जात नाही. त्यातच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील यांनी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांची भेट घेतली. त्यानंतर तोरस्कर यांनी सांगितले, पालिका आपल्या क्षेत्रातील कचरा उचलण्यास तयार आहे. एमआयडीसीने त्यांच्या हद्दीतील कचरा उचलावा. हा कचरा कुठे टाकावा, हा प्रश्न आहेच. त्यामुळे एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबतच प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका अधिकाऱ्यांची लवकरच एक संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढला जाईल. मुख्याधिकारीही शांतबदलापूर-शीळ मार्गावरील कचरा उचलावा, यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना नोटीस बजावताना त्यात त्यांनी पर्यावरणमंत्र्यांचा पाहणी दौरा व आदेशाचा उल्लेख केला होता.