शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आव्हानांशी सामना करा...

By admin | Updated: August 21, 2016 02:19 IST

रोजगारनिर्मिती करण्याची मानसिकता गेल्या दशकभरात वाढताना दिसत आहे. अर्थात, हे सगळे श्रेय एका संस्थेचे, एका व्यक्तीचे नसून या चळवळीत सामील असलेल्या, त्यातून घडलेल्या

- कुणाल गडहिरेरोजगारनिर्मिती करण्याची मानसिकता गेल्या दशकभरात वाढताना दिसत आहे. अर्थात, हे सगळे श्रेय एका संस्थेचे, एका व्यक्तीचे नसून या चळवळीत सामील असलेल्या, त्यातून घडलेल्या प्रत्येक उद्योजकाचे आहे. मात्र, बदलत्या काळानुसार मराठी उद्योजकांसमोर नवीन आव्हाने आहेत. नव्याने सुरू होत असलेले स्टार्ट अप्स पारंपरिक उद्योगांना थेट आव्हाने देत आहेत. ज्या प्रकारे उद्योग, व्यवसायामध्ये नवीन पिढी आली आहे, त्याच प्रकारे ग्राहकांचीसुद्धा नवीन पिढी आली आहे. या नव्या पिढीच्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सोशल मीडिया, आॅनलाइन, डिजिटल मार्केटिंग यांत मराठी उद्योजक मागे असल्याचे दिसत आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर ते भरारी घेत असताना, या नव्या आव्हानांचा सामना करत, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन संकल्पना शिकणे या गोष्टींकडे लक्ष द्यावे लागणार आहे.सन २०१० साली मी पहिल्यांदा बिझनेसमध्ये पडलो, शब्दश: पडलो होतो. माझ्याच सोबतच्या चार मित्रांना घेऊन, मी एक उपद्व्याप सुरू केला होता. अर्थात, नोकरीचा पर्याय होता, पण तो माझ्यासाठी नाही, इतके मनात नक्की होते, पण बिझनेस करायचा म्हणजे, एखादी भन्नाट कल्पना जन्माला घालायची आणि पैसे मिळवण्यासाठी त्यावर काम करायचे इतकेच जुजबी ज्ञान माझ्याकडे होते. त्यातली समीकरण कशी जुळवायची, याच्यात मी नापासच होतो आणि त्याचा परिणामसुद्धा दिसलाच. चार महिन्यांत बिझनेस बंद. तेव्हा एका अनुभवी उद्योजकाला भेटलो होतो. त्यांना सल्ला मागितल्यावर त्यांनी पहिला प्रश्न विचारला, बिझनेसमध्ये लॉस झाला आहे का? लॉस झाला आहे, सांगितल्यावर त्यांनी विचारले, मग तरीही बिझनेस करणार आहेसच का ? मी ‘हो’ म्हणालो. त्यानंतर त्यांनी सांगितले, ‘पहिला धडा तू गिरवला आहेसच, आत्ता फक्त, तो का गिरवावा लागला याचा अभ्यास कर.’ आयुष्यात खऱ्या अर्थाने माझी ‘शिकण्याची’ सुरुवात झाली ती इथून. पुन्हा नव्याने बिझनेस करत होतो. लोकांच्या गाठीभेटी घेत होतो. तेव्हा एकूणच उद्योग वर्तुळात एकच वाक्य कानावर यायचे, ‘मराठी माणूस बिझनेस करूच शकत नाही.’ अर्थात, त्याच्या पुढे मराठी माणसाने बिझनेस करायला पाहिजे वगैरे मोटिव्हेशन मसाला भरपूर भरलेला होता. या थीमखाली महाराष्ट्रात काही संस्था, तेव्हा मराठी उद्योजकांना आपापल्या वर्तुळात एकत्र करत होत्या. सॅटर्डे क्लब आणि मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळ या त्यातल्या दोन प्रमुख संघटना. या दोन्ही संस्थानी अनेक उद्योजकांची एक अख्खी पिढी घडवलेली आहे. आज काळानुसार या संस्थांनी त्यांच्या उपक्रमात बदल केले आहेत. अशा अनेक संस्थांमध्ये आपल्यासारखे आपल्याच पिढीतले आणखी उद्योजक आहेत आणि हे सगळे एकत्र येऊन एकमेकांना मदत करत आहेत, हे चित्र प्रेरणा देणारे होते. या संस्थांच्या माध्यमातून हजारो मराठी उद्योजकांचे एक उत्तम नेटवर्क तयार होत होते. मराठी उद्योजकांना उद्योगासाठी आवश्यक असणारे तंत्र, मंत्र, प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षण संस्था या काळात सुरू झाल्या होत्या. त्यांत समीर सुर्वे, अतुल राजोळी, बासू माळी, स्नेहल कांबळे यांच्यासारखे प्रशिक्षक व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमातून निव्वळ प्रेरणा देणाऱ्या गोष्टींपलीकडे जाऊन नेमके काय करायला पाहिजे हे समजावून सांगत होते. त्याच वेळी पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई, निर्माण ग्रुपचे अजित मराठे, शरद तांदळे, डिक्कीचे मिलिंद कांबळे यांसारख्या अनेक उद्योजकांनी अनेक मराठी उद्योजकांना त्यांच्या उद्योगामध्ये भक्कम पाठिंब्याने उभे केले. आता एका दशकानंतर स्वत:च्या उद्योगात स्थिरावत असतानाच, अर्थसंकेतचे अमित बागवे, साताऱ्याच्या युवा अभियान संस्थेचे मिलिंद कुचेकर, उद्योग मैत्रीणच्या सारिका भोईटे-पवार, नीलेश मोरे, उद्योजक मासिकाचे शैलेश राजपूत, चावडी पोर्टलचे प्राची आणि अमित मखरे हे उद्योजक, नवउद्योजकांना मदत करत आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये मराठी उद्योजकांसाठी अनेक चांगले उपक्रम आयोजित झाले आहेत. सॅटर्डे क्लबचा ‘उद्योगबोध’ आणि निलेश मोरे या वृत्तपत्र विक्रेत्याने सुरु केलेला 'मी उद्योजक होणारचं' हे दोन विशेष कार्यक्रम मराठी उद्योगविश्वात नावाजले आहेत. त्याचसोबत आज महाराष्ट्रात विविध स्थानिक ठिकाणी मराठी उद्योजकांचे बिझनेस क्लब सुरू झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात असे १०० हून जास्त लहान-मोठे बिझनेस क्लब आहेत. मराठी बिझनेस क्लब, मराठी इंटरनॅशनल क्लब, समृद्धी क्लब यासारख्या अनेक बिझनेस क्लबनी त्यांच्या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रथितयश नामांकित उद्योजकांशी थेट प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली. हे उद्योजक त्यांना आलेल्या समस्यांना कशा प्रकारे सामोरे गेले, हे थेट त्यांच्याकडूनच शिकता येत होते. तसेच उद्योजक मंडळींनी जनसंपर्काच्या माध्यमातून थेट बिझनेस मिळवून द्यावा, अशी यंत्रणा या बिझनेस क्लबनी राबवायला सुरुवात केली. त्याचा फायदा मराठी उद्योजकांना चांगल्या प्रकारे होत आहे.

(लेखक हे स्किल गुरुजी डॉट कॉम या स्टार्ट अपचे संस्थापक आहेत.)