शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

 राज्यात औषधांचा खडखडाट! रुग्णालये आणि हाफकिन दोघेही तेवढेच जबाबदार

By संतोष आंधळे | Updated: December 18, 2022 06:44 IST

वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजानिक आरोग्य विभाग या दोन्ही विभागांची औषधे खरेदी हाफकिन संस्थेमार्फत करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला. एकत्र खरेदी केल्यास चांगला दर मिळेल व औषधांच्या बाबतीत एकसूत्रीपणा येईल, हा हेतू त्यामागे होता. 

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील रुग्णालयांनी त्यांची औषधांची मागणी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच हाफकिन महामंडळाकडे नोंदवणे आणि हाफकिनने देखील त्यापुढील प्रक्रिया वेळेत पार पाडली तर राज्यात औषधांचा तुटवडा हाेणार नाही. मात्र, बहुतांश रुग्णालये मागणी नोंदविण्यास उशीर करतात व हाफकिनकडूनही विलंब होतो. त्यामुळे औषधांचा तुटवडा होऊन रुग्णांचे हाल होत आहेत. यासाठी रुग्णालये आणि हाफकिन दोघेही तितकेच जबाबदार असल्याच्या संतप्त भावना या क्षेत्रात काम करणाऱ्या वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केल्या आहेत. 

वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजानिक आरोग्य विभाग या दोन्ही विभागांची औषधे खरेदी हाफकिन संस्थेमार्फत करण्याचा निर्णय २०१७ मध्ये घेण्यात आला. एकत्र खरेदी केल्यास चांगला दर मिळेल व औषधांच्या बाबतीत एकसूत्रीपणा येईल, हा हेतू त्यामागे होता. 

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने  दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विभागाच्या औषधे आणि यंत्रसामग्री खरेदीच्या निविदा प्रक्रिया पार पडाव्यात. या गोष्टी वेळीच घडल्या तर विलंब होणार नाही. सध्या मात्र तसे होताना दिसत नाही. हाफकिन संस्थेने नवीन आर्थिक  वर्षाच्या सुरुवातीलाच संबंधित रुग्णालयांना मागणी नोंदविण्याचे पत्र पाठवावे. वेळेत मागणी न नोंदविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार हाफकिनला मिळायला हवेत.

औषधे आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी हाफकिन संस्थेतील कोट्यवधींचा निधी सरकारी तिजोरीत जमा होण्याच्या मार्गावर असून, निधीच्या वापरासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळविण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. हा निधी मिळाल्यास रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. अनेक डॉक्टरांनी यंत्रसामग्री मिळावी यासाठी नोंदणी करून ठेवली आहे. 

औषध खरेदी घोटाळ्यासंबंधी जनहित याचिका  सरकारच्या औषध खरेदी घोटाळ्यासंबंधी औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका सुरू आहे. औषध खरेदीसाठी आम्ही एक महामंडळ स्थापन करत आहोत. त्याद्वारेच सर्व विभागांची औषध खरेदी केली जाईल, असे शपथपत्र ॲडव्होकेट जनरल यांनी न्यायालयात सादर केले आहे. त्याविरुद्ध कुठलीही भूमिका घेणे सरकारसाठी अडचणीचे ठरणार आहे.  मात्र, कोणत्याही विभागाला महामंडळाकडून औषध खरेदी नको आहे. त्यामुळे अनेकदा औषधांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचे प्रकार वाढत आहेत, असेही एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

टॅग्स :medicineऔषधं