शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय क्षेत्रातील बाजारीकरण चिंताजनक

By admin | Updated: June 6, 2016 00:44 IST

हृदयाचे ठोके काहीसे कमी झाले होते... त्यामुळे डॉक्टरांनी ‘बायपास’ करण्याचा सल्ला दिला... आणि बायपास करण्याचे ठरले... आॅपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर अचानक डॉक्टरांनी अहो तुमचे ठोके आता

पुणे : हृदयाचे ठोके काहीसे कमी झाले होते... त्यामुळे डॉक्टरांनी ‘बायपास’ करण्याचा सल्ला दिला... आणि बायपास करण्याचे ठरले... आॅपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर अचानक डॉक्टरांनी अहो तुमचे ठोके आता व्यवस्थित नॉर्मल पडत आहेत, त्यामुळे आता ‘बायपास’ करण्याची गरज नाही, असे सांगून मला थिएटरच्या बाहेर आणले... एखादा सामान्य रुग्ण नव्हे, तर स्वत: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आपला हा अनुभव कथन करीत होते आणि तोही या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्यासमोर. आपल्या या अनुभवाच्या कडू डोसाद्वारे साहेबांनी, देशामधील वैद्यकीय क्षेत्रातील बाजारीकरणाची स्थिती चिंताजनक असल्याचे सांगून या व्यवसायाच्या वस्तुस्थितीवर बोट ठेवले. हर्डीकर हॉस्पिटल आणि ससून रुग्णालय यांच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा व ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. शरद हर्डीकर यांच्या ‘स्पाईन’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, डॉ. भूषण पटवर्धन, ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले आणि मदन हर्डीकर उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘‘आज वैद्यकीय क्षेत्रात ‘स्पेशलाईज’ डॉक्टरांची संख्या दिवसागणिक वाढत असून, ‘फॅमिली डॉक्टर’ची संकल्पना जवळपास हद्दपार झाली आहे. एक काळ असा होता, की फॅमिली डॉक्टरकडे गेले, की रुग्णाला बरे वाटायचे. आरोग्याबरोबरच इतर कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत, याबाबत ते मार्गदर्शन करायचे आणि अर्धा आजार पळून जायचा. मात्र स्पेशलायझेशनच्या काळात फॅमिली डॉक्टर ही संकल्पना पुसून गेली. आज हृदय, कर्करोग अशा विविध विभागांतील अनुभवी डॉक्टरांची फळी तयार झाली आहे. डॉ. शरद हर्डीकर यांनी शिकविणे हा एक नोबेल व्यवसाय आहे. शिक्षण आणि प्रशिक्षण हा एक ज्ञानयज्ञ असून, शिक्षक ज्ञानाची आहुती यज्ञात देत असतात, असे सांगून गुरू-शिष्य नात्यावर प्रकाश टाकला.