शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकलचे निवासी डॉक्टर संपावर

By admin | Updated: August 26, 2014 01:04 IST

रुग्ण गंभीर असताना ईसीजी काढण्यास टाळटाळ केल्याच्या घटनेवरून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जत घातली. यात नातेवाईक-डॉक्टर दोघांमध्ये मारहाण झाल्याने तणावाचे

रुग्णसेवा प्रभावित : डॉक्टर-रुग्णाच्या नातेवाईकांमध्ये मारहाण नागपूर : रुग्ण गंभीर असताना ईसीजी काढण्यास टाळटाळ केल्याच्या घटनेवरून रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांशी हुज्जत घातली. यात नातेवाईक-डॉक्टर दोघांमध्ये मारहाण झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास मेडिकलच्या अपघात विभागात घडली. या घटनेने संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने रात्री १ वाजतापासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. अचानक पुकारण्यात आलेल्या या संपाने रुग्णसेवा प्रभावित झाली.मिळालेल्या माहितीनुसार, नत्थूजी दुरडकर (७१) रा. ठाकरे ले-आऊट, मानेवाडा हा रुग्ण मेडिकलच्या अपघात विभागात रात्री ९.४५ वाजता आला. त्याच्या छातीत दुखत होते. डॉक्टरांनी त्याला तपासून ईसीजी काढण्यास सांगितले. परंतु रविवार सुटीचा दिवस असल्याने वॉर्ड क्र. २ नंबरच्या समोरील ईसीजी कक्ष बंद होता. रुग्णाचे नातेवाईक परत डॉक्टरांकडे आले. डॉक्टरांनी त्यांना वॉर्ड क्र. २४ या अतिदक्षता विभागातून ‘ईसीजी’ काढण्यास सांगितले. तिथे गेल्यावर तेथील कर्मचाऱ्याने थांबायला सांगितले. परंतु १५ मिनिटे होऊनही आत बोलावले नसल्याने रुग्णाच्या नातेवाईकाने पुन्हा कर्मचाऱ्याला विचारले, तेव्हा कर्मचाऱ्याने असभ्य भाषेचा वापर केला. याच वेळी कर्मचाऱ्याने ईसीजीचा रोल संपल्याचे सांगून थांबण्यास सांगितले. छातीत दुखत असलेल्या रुग्णाला उपचारासाठी वेळ लागत असल्याचे पाहत रुग्णाचे नातेवाईक संतप्त झाले. ते पुन्हा त्या संबंधित डॉक्टरांकडे गेले. परंतु डॉक्टरने ईसीजी नसल्याचे कारण पुढे करीत उपचार करण्यास टाळाटाळ केली. याच वेळी रुग्णाच्या एका पुरुष नातेवाईकाने डॉक्टरची कॉलर पकडून धक्काबुक्की केली. डॉक्टराने आरडाओरड केली तेव्हा आजूबाजूचे डॉक्टर धावून आले. त्यांनी त्या रुग्णाच्या नातेवाईकाला चांगलाच चोप दिला. याच वेळी पोलिसही आले. त्यांनी भांडण सोडवत जखमी नातेवाईकाची बाजू घेतली.यामुळे संतप्त झालेल्या सर्व निवासी डॉक्टरांनी रात्री १२ वाजता अजनी पोलीस ठाण्यात जाऊन रुग्णाच्या नातेवाईकांविरोधात तक्रार दाखल केली; सोबतच डॉक्टरांच्या सुरक्षेची मागणी उचलून धरत रात्री १ वाजता बेमुदत संपाची घोषणा केली. मेडिकल वाऱ्यावररविवारी रात्री अचानक निवासी डॉक्टर संपावर गेल्याने मेडिकल प्रशासनाची धावपळ उडाली. विशेष म्हणजे यावेळी एकाही वरिष्ठ डॉक्टराने मेडिकलला भेट दिली नाही. वॉर्डावॉर्डात डॉक्टर नव्हते. अपघात विभागासह संपूर्ण मेडिकल वाऱ्यावर होते.सात रुग्णांचा मृत्यूनिवासी डॉक्टर शासकीय रुग्णालयाचा कणा असतो. परंतु रविवारी रात्रीपासून हेच डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. परिणामी सात रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारीही हा संप सुरू होता. त्यामुळे बाह्य रुग्ण विभागावरही याचा परिणाम झाला. जिथे पाच निवासी डॉक्टर असायचे तिथे दोन वरिष्ठ डॉक्टर जबाबदारी सांभाळत होते. यामुळे रुग्णांच्या लांब रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे सायंकाळपर्यंत फक्त १२८ रुग्णांनाच भरती करून घेण्यात आले. आज दिवसभरात १५ महत्त्वाच्या तर २६ किरकोळ शस्त्रक्रिया झाल्या. अनेक नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्याची माहिती आहे.चौकशी समिती स्थापन रविवारी मेडिकलच्या अपघात विभागात झालेल्या रुग्ण-डॉक्टरांमधील मारहाणप्रकरणी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. औषधवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. सहस्रभोजने यांच्या अध्यक्षतेखाली या समितीत डॉ. संध्या बक्षी, डॉ. सोमलवार व डॉ. नंदू जयस्वाल यांचा समावेश आहे. उद्या, मंगळवारी सायंकाळपर्यंत समितीला आपला अहवाल सादर करायचा आहे.(प्रतिनिधी)मारहाण आणि डांबून ठेवल्याचा आरोपट्रीटमेंट कार्डवर सही करण्यास नकार दिल्यामुळे डॉक्टरांनी आपल्या कक्षात डांबून ठेवले आणि मारहाण केली, अशी तक्रार मकरंद नत्थूजी दुरडकर (वय ३३) यांनी केली. त्यावरून अजनी पोलिसांनी मेडिकलच्या डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल केले. मकरंद याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, वडील नत्थूजी दुरडकर यांना उपचारासाठी मेडिकलमध्ये नेण्यात आले होते. ईसीजी पेपर नसल्याने वाद झाला. यावेळी दुरडकर यांच्या नातेवाईकांनी कागदपत्रे डॉक्टरांना परत मागितली. डॉक्टरांनी ट्रीटमेंट कार्डवर सही करण्यास सांगितले. त्यांनी नकार देताच डॉक्टरांनी मकरंद यांना आपल्या कक्षात डांबून मारहाण केली. मकरंद यांच्या या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी संबंधित डॉक्टरांविरुद्ध गुन्हे दाखल केले. घटनेच्या वेळी कोणते डॉक्टर कर्तव्यावर होते, त्याची आता पोलीस चौकशी करीत आहेत. विशेष म्हणजे, डॉ. पवन पारसनाथ सिंग (वय २६) यांनी दुरडकर आणि त्यांच्या नातेवाईकांनी आपल्याला मारहाण केल्याची अजनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. पोलिसांनी त्यावरून दुरडकर यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले होते.‘मार्ड’च्या मागण्या अशा आहेतडॉक्टर सुरक्षा कायदा लागू करावा, सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ करून १५० करावे, यात महिला सुरक्षा रक्षकांचाही समावेश असावा, अस्तित्वात असलेल्या सुरक्षा एजन्सीला बदलून माजी सैनिकांच्या सुरक्षा एजन्सीला याची जबाबदारी सोपवावी, अपघात विभागात एक्स-रे मशीन, ईसीजी व इतर आवश्यक यंत्रणा असाव्यात, पाच खाटांची रिकव्हरी रूम व्हेंटिलेटरसह उपलब्ध करून द्यावी, चतुर्थ कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, गेटपासची सोय उपलब्ध करावी व डॉक्टरांशी गैरवर्तणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.