शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

मेडिकलच्या प्राध्यापकाला विद्यार्थिनींचा चोप

By admin | Updated: June 7, 2016 22:02 IST

प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या येथील ह्यमेडिकलह्णच्या मनोविकृतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापकाला बेदम चोप दिल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.

ऑनलाइन लोकमत

यवतमाळ, दि. ७ : प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या येथील ह्यमेडिकलह्णच्या मनोविकृतीशास्त्र विभागाच्या प्राध्यापकाला बेदम चोप दिल्याची घटना मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. विद्यार्थिनींनी चोप देत प्राध्यापकाला अधिष्ठातांच्या कक्षापर्यंत नेले. हा प्रकार पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती.सदर सहायक प्राध्यापकाकडे मनोविकृतीशास्त्र विभागाची जबाबदारी असून त्याने एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरची शिबिरादरम्यान छेड काढली होती. सुरुवातीला या प्रकाराकडे सदर विद्यार्थिनीने दुर्लक्ष केले. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा प्राध्यापक पुन्हा स्त्रीरोग वार्डाकडे भटकायला आला. याची माहिती या विद्यार्थिनीने आपल्या सहकाऱ्यांना दिली. आठ ते दहा विद्यार्थिनींनी या सहायक प्राध्यापकाला पकडून चांगलाच चोप दिला. कॉलर पकडून विद्यार्थिनींनी प्राध्यापकाच्या कानशिलात लगावल्या. अचानक झालेल्या या प्रकाराने प्राध्यापक चांगलाच घाबरला. यानंतरही विद्यार्थिनींनी त्याला येथेच्छ चोप दिला.बेदम मार खाऊन गलितगात्र झालेल्या या प्राध्यापकाला तशाच अवस्थेत मारहाण करीत अधिष्ठातांच्या कक्षाकडे आणण्यात आले. हा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.दरम्यान या घटनेबाबत अधिष्ठाता आणि अधीक्षकाकडे विचारणा केली असता अशी कोणतीच तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगण्यात आले. तक्रार आल्यास विशाखा समितीकडून चौकशी करण्यात येईल, असे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी सांगितले. सदर सहायक प्राध्यापकाविरोधात यापूर्वीसुद्धा तक्रारी होत्या. मात्र पुढे येण्यास कुणीही धाडस करीत नव्हते. परंतु मंगळवारी एका विद्यार्थिनीने धाडस दाखवून आपल्या सहकारी विद्यार्थिनीच्या मदतीने या मनोविकृतीशास्त्राच्या प्राध्यापकाचा चांगलाच समाचार घेतला. या बेदम धुलाईची दिवसभर वैद्यकीय महाविद्यालय परिसरात चर्चा होती. परंतु या प्रकरणात सदर प्राध्यापकावर कारवाई करण्याऐवजी त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने केल्याचे सध्या तरी दिसत आहे.