शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय साहित्याचे होलसेलर्स एफडीएच्या रडारवर

By admin | Updated: June 1, 2017 03:54 IST

वैद्यकीय साहित्याच्या पुनर्वापरप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) रुग्णालयांची झाडाझडती सुरू केली होती. रुग्णालयांनंतर

स्नेहा मोरे /लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वैद्यकीय साहित्याच्या पुनर्वापरप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) रुग्णालयांची झाडाझडती सुरू केली होती. रुग्णालयांनंतर आता एफडीएने आपला मोर्चा वैद्यकीय साहित्याच्या होलसेलर्सकडे वळविला आहे. या प्रकरणी त्यांचीही तपासणी होणार असून, पुढील आठवड्यात याविषयीचा अहवाल एफडीए सादर करणार आहे.एफडीएने मागच्या काही दिवसांत वैद्यकीय साहित्यांचा होणारा पुनर्वापर; शिवाय पुनर्वापर करतानाही रुग्णांकडून स्वीकारण्यात येणारी किंमत याचे प्रकरण उघडकीस आणले होते. याविषयी, मुंबई शहर-उपनगरातील काही नामांकित खासगी रुग्णालयांना नोटीसही पाठविण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवर त्यानंतर रुग्णालयांची तपासणी मोहीम एफडीएने हाती घेतली. आता वैद्यकीय साहित्याचे उत्पादन करणारे होलसेलर्सकडे याविषयी तपासणी करण्यात येणार आहे. त्या तपासणीत वैद्यकीय साहित्यांचे उत्पादन, वितरण, दर्जा, पुनर्वापर, अधिकृत होलसेलर्स या विविध घटकांची तपासणी एफडीएकडून करण्यात येणार आहे.काही आठवड्यांपूर्वी एफडीच्या कारवाईत अँजिओप्लास्टीसाठी जुने आणि वापरलेले बलून कॅथेटर आणि गायडिंग कॅथेटरचा वापर केला जात असल्याचे उघड झाले होते. रुग्णालयांकडून कॅथेटरचा पुनर्वापर करतानाच त्याची किंमतही पुरेपूर वसूल केली जात असल्याची माहिती समोर आल्यानंतर एफडीएने हिरानंदानी रुग्णालय, फोर्टिस रुग्णालय आणि बीएसईएस या रुग्णालयांना नोटीसही बजावली होती. तसेच, मागील महिन्यात घाटकोपर येथील रुबी डायग्नॉस्टिक सेंटरवरही एफडीएने छापा टाकला. या वेळी येथे गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या एमटीपी किट्सचा अवैध साठा जप्त करण्यात आला.अहवाल पुढच्या आठवड्यातएफडीएला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर काही नामांकित रुग्णालयांना वैद्यकीय साहित्याच्या पुनर्वापराप्रकरणी नोटीस बजावण्यात आली, शिवाय त्यानंतर रुग्णालयांचीही तपासणी करण्यात आली. या प्रकरणाच्या खोलात शिरण्यासाठी या प्रकरणी सर्व घटकांवर प्रकाशझोत टाकला पाहिजे. त्यामुळे आता वैद्यकीय साहित्याच्या होलसेलर्सची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्व प्रकरणाचा अहवाल पुढच्या आठवड्यात सादर करणार आहोत.- डॉ. हर्षदीप कांबळे, अन्न व औषध प्रशासन विभाग, आयुक्त