शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय नियतकालिकांच्या खरेदीत घोटाळा?

By admin | Updated: June 22, 2016 20:20 IST

वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयासाठी खरेदी केलेल्या नियतकालिकांच्या किंमतीने स्थायी समितीच्या तोंडाला फेस आणला आहे़

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 22-  वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयासाठी खरेदी केलेल्या नियतकालिकांच्या किंमतीने स्थायी समितीच्या तोंडाला फेस आणला आहे़ मूळ किंमतीपेक्षा चार ते दहापट अधिक किंमत लावून या नियतकालिकांची खरेदी केल्याचा आरोप मनसेने केला आहे़ त्यामुळे या खरेदीची चौकशी करण्याचा निर्णय स्थायी समितीने आज घेतला़पालिका अधिनियम ७२ (२) अन्वये पालिका आयुक्त ५० ते ७५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च आपल्या अधिकारात करु शकतात़ मात्र यामध्ये एका नियतकालिकाची किमान किंमत पाच ते आठ लाख रुपये दाखविण्यात आली आहे़ बाजारात या पुस्तकांची किंमत ७५ हजार रुपयांपर्यंत असल्याने या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला़ या वैद्यकीय पुस्तकांच्या मूळ किंमतीसह यादी सादर करण्याची सुचनाही स्थायी समितीने केली होती़ मात्र या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली़ दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेली ही पुस्तकं कोणती, असा सवाल सदस्यांनी केला़ परंतु याबाबत प्रशासनाकडे समाधानकारक उत्तर नसल्याने अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत.या खरेदी अंतर्गत केईएम रुग्णालयासाठी २५ एप्रिल रोजी प्रमुख रुग्णालयाच्या संचालकांनी खरेदी केलेली नियतकालिके तब्बल पाच लाख ५८ हजार रुपये एवढ्या किंमतीची होती़. दुसरी नियतकालिकेची किंमत सहा लाख ६२ हजार रुपये होती, तर अन्य दोन नियतकालिांची प्रत्येकी आठ लाख ५४ हजार रुपये किंमत होती़. या नियतकालिका वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यासाठी खरेदी करण्यात आल्या आहेत़ यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.