शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

चंदू चव्हाण यांची वैद्यकीय तपासणी

By admin | Updated: January 23, 2017 04:06 IST

पाकिस्तानातून भारतात सुखरूप परतलेले जवान चंदू बाबुलाल चव्हाण सध्या अमृतसर येथे आहेत. तेथे सैन्याच्या नियमानुसार

धुळे : पाकिस्तानातून भारतात सुखरूप परतलेले जवान चंदू बाबुलाल चव्हाण सध्या अमृतसर येथे आहेत. तेथे सैन्याच्या नियमानुसार त्यांची सर्व आवश्यक वैद्यकीय तपासणी आणि चौकशी पूर्ण झाल्यावर तीन ते चार दिवसांनी ते गावाकडे येऊ शकतील, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे यांनी रविवारी धुळ्यात दिली़चंदू चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी रविवारी डॉ़ भामरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे आभार मानले. चंदू बोरविहीरला कधी येणार, याची सर्वांनाच उत्सुकता आहे़ चंदू चव्हाण बेपत्ता झाल्यानंतर डॉ़ भामरे यांनी बोरविहीर येथे त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन चंदूला नक्की परत आणू, असे आश्वासन दिले होते़चंदू यांचे मोठे बंधू भूषण आणि आजोबा चिंधा पाटील यांनी रविवारी सकाळी धुळ्यात डॉ. भामरे यांची भेट घेतली. त्या वेळी बोरविहीर येथील युवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. चंदूच्या सुखरूप परतीबद्दल दिलेला शब्द आपण पाळला. आपण पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांशी आठवड्यात दोनदा बोलायचो; तसेच संरक्षण व परराष्ट्र मंत्रालयातर्फे त्यांच्यावर दबाव निर्माण केल्यामुळेच हे होऊ शकले, असे भामरे यांनी सांगितले. आपण अमृतसरलासुद्धा जाऊन चंदूची भेट घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. (प्रतिनिधी)