औरंगाबाद : एमएच-सीईटी २०१६ च्या नियमानुसार वैद्यकीय प्रवेशासाठी कोणतीही पूर्वसूचना न देता अतिरिक्त गुणांचा लाभ काढून घेतल्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. एमएच-सीईटी २०१५ च्या मागील वर्षाच्या नियमानुसार वैद्यकीय प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘अॅनेक्शर-जी’ प्रमाणे एन.सी.सी. आणि क्रीडा प्रतिनिधित्वासाठी प्रत्येकी २ गुणांचा लाभ दिला गेला. मात्र, यावर्षीच्या एमएच-सीईटी २०१६ च्या नियमानुसार वरीलप्रमाणे अतिरिक्त गुणांचा लाभ कोणतीही पूर्वसूचना न देता काढून घेतला आहे. त्यामुळे एन.सी.सी. आणि क्रीडा क्षेत्रासाठी वेळ खर्च करणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत आहे. (प्रतिनिधी)
वैद्यकीय प्रवेश परीक्षा; उच्च न्यायालयात याचिका
By admin | Updated: May 30, 2016 04:41 IST